करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी  नियम न पाळणा-यांवर दंडात्मक कारवाई करा :  
ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे यांची मुख्यमंत्री, नगरविकास मंत्रयाकडे मागणी
डोंबिवली/ प्रतिनिधी: मुंबईसह ठाणे, कल्याण डोंबिवली परिसरात करोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. शासन व प्रशासनाकडून सर्वतोपरी उपाययोजना सुरू आहेत मात्र तरीही काही नागरिकांकडून शासनाच्या नियमांचे पालन केले जात नाही. त्याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे.  त्यामुळे आता कडक कारवाईचा निर्णय घ्यावा लागणार असून, शासन प्रशासनाचे नियम न पाळणाऱ्या  लोकांवर दंडात्मक कारवाई करावी, तरच करोनाची साखळी तोडता येईल. अशी मागणी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक वामन म्हात्रे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,  नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
कोविड 19  महामारी राज्यात पसरण्याअगोदरपासूनच शासन प्रशासन  दिवस रात्र परिश्रम घेऊन सर्व प्रकारच्या उपाय योजना करीत आहेत. त्यामुळे करोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यात काही प्रमाणात यश येत आहे. प्रशासनाकउून घराबाहेर न पडण्याचे व सोशल डिस्टन्सींगचे पालन करण्याचे आवाहन अनेक दिवसांपासून केले जात आहे, मात्र अजूनही काही नागरिकांना याचे गांर्भिय नसल्याने  या नियमांचे पालन करताना दिसत नाही. त्यामुळे अशा बेजबाबदारपणे वागणा-या लोकांवर दंडात्मक कारवाई करावी. नियमांचे पालन न करणा-या नागरिकांमुळे मुंबई, ठाणे परिसरात करोनाचा फैलाव वाढू शकतो त्यामुळे  वेळीच निर्णय घेण्याची आवश्यकता आहे अशी मागणी  नगरसेवक म्हात्रे यांनी मुख्यमंत्री व पालकमंत्रयाकडे केली  आहे. तसेच विरोधी पक्षांकडून सोशल मिडीयावर खोटी व गैरसमज पसरवणारी माहिती व्हायरल केली जात आहे याकडेही लक्ष वेधले आहे.
आरोग्य सेतूचा वापर करा
गेल्या दीड महिन्यापासून पालिकेचे सर्व कर्मचारी दिवस रात्र काम करत आहात मात्र तरीही करोना रुग्णाची  संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, मात्र आरेाग्य सेतू या अॅपचा वापर केल्यास रूग्णांचा  तातडीने शोध घेतला जाऊ शकतो. त्या आरोग्य सेतूच्या माध्यमातून  पालिकेने प्रभाग निहाय सर्व्हे करावा,  अन्यथा येत्या 15 दिवसात करोना रुग्णाचा आकडा चौपट होऊ शकतो त्यासाठी खबरदारी म्हणून सुचना करीत असल्याचेही नगरसेवक म्हात्रे यांनी पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांना केली आहे
——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!