दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील सहाव्या टप्प्यातील ५८ जागांवर मतदान सुरू आहे. मतदान केंद्रावर मतदान संथगतीने सुरू आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी कुटुंबासह मतदान केले. केजरीवाल यांनी त्यांच्या पत्नीसोबत चांदनी चौक लोकसभा मतदारसंघात मतदान केले. दिल्लीतील लोधी इस्टेट येथील आदर्श स्कूलमध्ये काँग्रेस नेता प्रियंका गांधी यांचे पूत्र रेहान यांनी मतदान केले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, वडील पत्नी आणि दोन्ही मुलांनी मतदान केले आई खूपच आजारी असल्याने येऊ शकली नाही. हुकूमशाही, महागाई बेरोजगारी या विरोधात मतदान केले उन्हाचा कडाका खूप आहे मात्र घरीच न बसता मतदान करावे हुकूमशाही विरोधात मतदान करण्याचेे आवाहन केजरीवाल यांनी केले.
रेहान वड्र माध्यमांशी बोलताना म्हणाला की यंदाची निवडणूक ही महत्वाची आहे महागाई रोजगार आणि संविधान हे महत्वाचे मुद्दे आहेत. मतदारांनी लोकशाहीच्या सहभागी होऊन मतदान करावे तसेचसंविधान वाचविण्यासाठी युवकांनी मतदान करावे असे आवाहन त्यांनी केले.
दिल्लीतील सात जागांवरही मतदान होत आहे. यावेळी १३६३७ मतदान केंद्रांवर दीड कोटी लोक १६२ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. दिल्लीत दुपारी १ वाजेपर्यंत ३४.३७ टक्के मतदान झाले चांदणी चौक – ३२.१८ टक्के पूर्व दिल्ली- ३४.२४ टक्के नवी दिल्ली-३१.६६ टक्के ईशान्य दिल्ली- ३७.३१ टक्के उत्तर पश्चिम दिल्ली – ३५.७२ टक्के दक्षिण दिल्ली- ३३.४९ टक्के पश्चिम दिल्ली- ३४.१२ टक्के