कल्याण : पश्चिमेतील एका किराणाच्या दुकानात बरण्यांच्या मागे एक हिरवा साप दिसून आल्याने दुकान मालक घाबरला. समोर ग्राहकही होते. त्यांचीही फाफलली. त्वरीत याची माहिती सर्पमित्र दत्ता बोंबे यांना देण्यात आली. तात्काळ बोंबे यांनी दुकानात धाव घेतली. सापाला पडकले. पकडण्यात आलेला साप हा हरण टोळ होता. हा साप निमविषारी असतो. याची माहिती वन विभागाला देण्यात आली आहे. वन विभागाकडे हा साप सूपूर्द केला जाणार आहे. सर्प मित्राच्या मदतीने वन विभागाकडून या सापाला जंगलात सोडण्यात येणार आहे अशी माहिती दत्ता बोंबे यांनी दिली आहे. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.