डोंबिवली : डोंबिवलीतील गणेश मंदीर संस्थानाने गणेश मंदीरात त्रिपूरी पोर्णिमेचे औचित्य साधून आयोजित केलेल्या दिपोत्सवास डोंबिवलीकरांनी उदंड प्रतिसाद दिला. मंदीराचा गाभारा आणि बाहेरचा परीसर साधारणपणे १५०० ते २००० पणत्यांनी उजळून निघाला होता. सोबत १५० ते २०० महिलांचे सुक्त पठण सुरू होते.
दिपोत्सवाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट आणि इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली यांच्यावतीने खाद्यतेल दानयज्ञ या उपक्रमा अंतर्गत साधारणपणे १००० लिटर खाद्यतेल डोंबिवलीकरांकडून गोळा करण्यात आले. सदर तेल आसपासच्या परीसरातील वृध्दाश्रम, वसतीगृहे आणि मतीमंद मुलांच्या शाळांना वाटण्यात येणार आहे. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्टचे अध्यक्ष शैलेश गुप्ते आणि इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली वेस्टची अध्यक्षा शुभांगी काळे यांनी डोंबिवलीकरांचे खाद्यतेल दानयज्ञाला दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आभार मानले.