मुंबई : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला मोदी 3.0 सरकारचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प विकसित भारताच्या संकल्प पूर्तीच्या यात्रेतील मैलाचा दगड ठरेल. अतिशय संतुलित असलेला हा भारताच्या भविष्यावर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणारा अर्थसंकल्प आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
शेतकरी, महिला युवा आणि गरीब या घटकांना समोर ठेऊन मांडण्यात आलेल्या या अर्थसंकल्पात सामाजिक क्षेत्रामध्ये गुंतवणुकीत देखील लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. यासोबतच पायाभूत सुविधा, कृषी, बँकिंग, ऊर्जा, उद्योग, संशोधन आणि एमएसएमई अशा विविध क्षेत्रांवर या अर्थसंकल्पामध्ये विशेष लक्ष देण्यात आले आहे.
विदर्भ आणि मराठवड्यातील दुष्काळग्रस्त भागातील सिंचन प्रकल्पांपासून मुंबई, पुणे आणि नागपूर मेट्रोसाठी तसेच महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी या अर्थसंकल्पामध्ये केलेली विशेष तरतूद मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारचे महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाकडे असलेले विशेष लक्ष अधोरेखित करते.
केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले, याची यादी !
- विदर्भ मराठवाड्यातील सिंचन प्रकल्प: ₹600 कोटी
- महाराष्ट्र ग्रामीण रस्ते सुधार: ₹400 कोटी
- सर्वसमावेशक विकासासाठी इकॉनॉमिक कॉरिडॉर: ₹466 कोटी
- पर्यावरणपूरक शाश्वत कृषि प्रकल्प: ₹598 कोटी
- महाराष्ट्र कृषी आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प: ₹150 कोटी
- MUTP-3 : ₹908 कोटी
- मुंबई मेट्रो: ₹1087 कोटी
- दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉर: ₹499 कोटी
- MMR ग्रीन अर्बन मोबिलिटी: ₹150 कोटी
- नागपूर मेट्रो: ₹683 कोटी
- नाग नदी पुनरुज्जीवन: ₹500 कोटी
- पुणे मेट्रो: ₹814 कोटी
- मुळा मुठा नदी संवर्धन: ₹690 कोटी
अजून बरेच काही. या केवळ 2/3 विभागांच्या तरतुदी..