ठाणे ( अविनाश उबाळे ) : अखंड महाराष्ट्राचे श्रध्दास्थान असलेले श्रीक्षेत्र आळंदी येथे लाखोंच्या संख्येने वारकरी भक्त जात असतात त्यामध्ये ठाणे जिल्हा ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात वारकरी भक्त आळंदीसाठी पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात असतात तसचे दोन चार दिवस परमेश्वराच्या भक्तीसाठी निवास करत असतात अशा वेळी निवासी थांबवण्याची व्यवस्था नसल्याने जिल्हाभरातून वारकरी यांची मोठी अडचण होत होती.
अशा सर्व वारकरी भक्तांची अडचण लक्षात घेता दानशुर नेते दयानंद चोरघे यांनी स्वखर्चाने आळंदी येथे स्व.बाळू चिमा चोरघे यांच्या स्मरणार्थ धर्मशाळा वास्तु उभारली असुन त्याचा वास्तुशांती सोहळा ठाणे जिल्हायाच्या ग्रामीण भागातील हजारों वारकरी भक्तांसोबत आळंदी येथे पार पडला.यावेळी समस्त वारकरी भक्तांनी दानशुर नेते दयानंद चोरघे यांचे आभार मानले असुन समाधान व्यक्त केले त्यासोबत धर्मशाळेचा वापर सुरु झाला असुन वारकरी भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.