कल्याणात अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात 
कल्याण : येथील  शिवसेना प्रभाग क्र.३८ रामबाग यांच्यावतीने  “श्री दत्त प्रभुंचा  जयंती सोहळा” त्यानिमित्त अखंड हरीनाम सप्ताह, श्रीमद भागवत कथा आणि ज्ञानेश्वरी परायणा चे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी या सोहळ्याची  कलश पूजा, घटस्थापना, ध्वजारोहण करून सुरुवात करण्यात आली, त्याप्रसंगी   केडीएमसीचे महापौर राजेंद्र  देवळेकर,  नगरसेविका वीणा जाधव, माजी नगरसेवक गणेश जाधव, विभागप्रमुख  मारुती नागरे, उपविभाग प्रमुख भागवत बैसाने  यांच्यासह शिवसैनिक युवा सैनिक  व महिला आघाडी  कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेना महानगर प्रमुख विजय साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून,  ४ डिसेंबर पर्यंत हा सोहळा सुरू राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *