वाचा दक्षता .. पोलीस आणि जनतेच्या अपेक्षांचा मागोवा आणि बरंच काही …
मुंबई : सर्वसामान्य माणसांच्या पोलिसांकडून अपेक्षा असतात तशाच पोलिसांनाही त्यांच्याकडून काही अपेक्षा असतात असा पोलीस आणि नागरिक यांच्यातील नात घट्ट करणारा व या सगळयांचा मागोवा यंदाच्या नववर्षातील जानेवारीच्या दक्षता मासिकात घेण्यात आलाय.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा “पोलिस आणि नागरिकांच्या अतूट सहकार्यातून समाजाची सुरक्षितता अधिक भक्कम” हा लेख देखील “दक्षता” मध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पोलिसांच्या कर्तव्याबाबत आणि कायद्याला धरून असणाऱ्या कृतीबाबत जेव्हा सामान्य अपेक्षा ठेवतात तेव्हा त्यांच्याकडूनही पोलिसांना काही अपेक्षा असतात याबाबत “बदलती वाटचाल” हा अपर पोलिस महासंचालक व्ही व्ही लक्ष्मीनारायण यांचा लेख आहे. महाराष्ट्र पोलिसांच् रूपच नव्हे तर यंत्रसामुग्रीही बदलत आहे हा सहाय्यक पोलीस महानिरीक्षक दीपाली मासिरकर यांचा लेख हा पोलीस विभागातील अनेक नवनवीन योजनांचा आणि बदलत्या स्वरूपाचा, यंत्रसामुग्रीबाबत माहिती देणारा ठरलाय. मुखपृष्ठ कथा गिरीश कुबेर यांच्या लेखणीतून मांडली गेलीय. त्याचप्रमाणे मराठवाड्यातील पोलिसांचे कार्य, मराठवाड्यातील सौंदर्यस्थळं आणि याचबरोबर संक्रांतीचे पदार्थ यांचाही समावेश यंदाच्या अंकात करण्यात आला आहे. त्यामुळे यंदाचा दक्षता अंक अधिकच वाचनीय झालाय.