ठाणे, दि.18 : दही हंडी निमित्त ठाणे शहरातील विविध भागातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले असल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त दत्तात्रय कांबळे यांनी कळविले आहे.

        प्रवेश बंद पूर्व द्रुतगती महामार्गावरून कोपरी ब्रिज, तीनहात नाका, धर्मविर नाका-नितीन कंपनी नाका येथून ठाणे शहरात (वंदना बस स्टॉप-स्टेशन बाजूस) येणाऱ्या एस.टी. टीएमटी, बीईएसटी व खाजगी बसेसना नमूद नाक्यांवरून आत येण्यास व ठाणे स्टेशन कडून वर नमूद नाक्यांमार्गे जाण्यास "प्रवेश बंद" करण्यात आली आहे.

        पर्यायी मार्ग सदरच्या सर्व बसेस कॅडबरी नाका खोपट नाका-आंबेडकर रोडने जी.पी.ओ. नाक्याकडे तसेच गोल्डन डाईज नाका मार्गे मिनाताई ठाकरे चौक कडून जी.पी.ओ. नाक्यावरून कोर्ट नाका-आबेडकर पुतळा-जांभळी नाका भाजी मार्केट मार्गे ठाणे पूर्व स्टेशन बाजूकडे जातील.

        प्रवेश बंद ठाणे स्टेशन सॅटीस ब्रिजवरून टॉवर नाक्याचे दिशेने जाणाऱ्या एस.टी./ टीएमटी बसेसना सॅटीस ब्रिज येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

        पर्यायी मार्ग सदरच्या सर्व बसेस हया ठाणे रेल्वे स्टेशन कडुन सॅटीज ब्रिजवरुन दादा पाटील वाडी मार्गे गोखले रोडने टेलीफोन नाका-तिनहात नाक्या कडून इच्छित स्थळी जातील.

        प्रवेश बंद सर्व गोविंदा पथकाच्या वाहनाना कोपरी ब्रिज नाका, तीनहात नाका, धर्मविर नाका-नितीन कंपनी नाका, कॅडबरी नाका येथून ठाणे शहराच्या अंतर्गत भागात व स्टेशन बाजूस जाणाऱ्या वाहनांस नमूद नाक्यांवर "प्रवेश बंद" करण्यात येत आहे.

        पर्यायी मार्ग सदरची सर्व वाहने हे पूर्व द्रुतगती महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर पार्किंग करण्यात येतील.

        नो पार्किंग ठाणे महानगरपालिका भवन ते अल्मेडा चौक ते महापालिका भवन ते ओपन हाउस आराधना कॉस, ओपनहाउस ते भक्ती मंदिर या दरम्यान रस्त्याचे दोन्ही बाजूस सर्व प्रकारच्या वाहनांनसाठी "नो पार्किंग " करण्यात येत आहे. टॉवर नाका गडकरी रंगायतन-बोटींग क्लब पर्यंत मासुंदा तलावाचे (तलावपाळी) रोडचे दोन्ही बाजूस सर्व प्रकारची वाहने पार्किंग करण्यास मनाई करण्यात येत आहे.

        सदरची अधिसुचना ही फायरब्रिगेड, रूग्णवाहिका, पोलीस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनाना लागू राहणार नाही. सदरची अधिसुचना ही दि. 18 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 07.00 ते 23.00 वा. पर्यंत अमलात राहिल, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त दत्तात्रय कांबळे यांनी कळविले आहे.
भिवंडी शहरातील वाहतुकीमध्ये बदल

गोपाळकाला निमित्त दहीहंडी उत्सव साजरा होणार असल्याने दि. 19 ऑगस्ट रोजी भिवंडी शहरातील वाहतुकीमध्ये पुढील बदल करण्यात आले आहे.

    प्रवेश बंद - राजनोली नाक्याकडुन भिवंडी शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड, मध्यक व हलक्या वाहनांना (कार, रिक्षा, दुचाकी) तसेच एस. टी., के. डी.एम.टी., टी.एम.टी. बसेस यांना रांजनोली नाका येथे प्रवेश बंद' करण्यात येत आहे.

        पर्यायी मार्ग सर्व प्रकारची जड, मध्यम व हलकी वाहने रांजनोली नाका येथून वळसा घेवून मुंबई-नाशिक बायपास हायवे वरील माणकोली नाका येथून अंजूर फाटा किंवा वसई रोडने किंवा ओवळी खिंड येथून डावीकडे वळण घेवून ओवळी गांव. ताडाळी जकात नाका, पाईपलाईन रोडने इच्छित स्थळी जातील. एस. टी., के.डी.एम.टी., टी.एम.टी. बसेस रांजनोली नाका येथे प्रवासी उतरवतील व तेथुनच प्रवासी भरून इच्छीत स्थळी जातील.

        प्रवेश बंद  वाडा रोड मार्गे भिवंडी शहराकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड, अवजड वाहनांना अंबाडी नाका येथे प्रवेश बंद' करण्यात येत आहे.

        पर्यायी मार्ग सदरची जड, अवजड वाहने अंबाडी नाका येथून रा.म.क. 8 ने अथवा बृहन्मुंबई महानगरपालिका पाईपलाईन मार्गे इच्छीत स्थळी जातील.

        प्रवेश बंद वाडा रोडने नदीनाका मार्गे भिवंडी शहराकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना पारोळ फाटा (नदीनाका) येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

    पर्यायी मार्ग सदर सर्व प्रकारची वाहने पारोळ फाटा येथून उजवीकडे वळण घेवुन खोणीगाव, तळवली फाटा. कांबा रोड या पर्यायी मागनि वसई रोड येथुन डावीकडे वळण घेवून कारीवली मार्गे अथवा विश्वभारती फाटा येथून डावीकडे वळण घेवून गोरसई गाव मार्गे इच्छीत स्थळी जातील.

        प्रवेश बंद वडपा चेकपोस्ट मार्गे भिवंडी शहरात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना (एस. टी. बसेससह) धामणगांव, जांबोळी, पाईपलाईन नाका व चाविंद्रा जकात नाका येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.

        पर्यायी मार्ग  सर्व प्रकारची वाहने धामणगांव पाईपलाईन येथे उजवीकडे वळण घेवुन पाईपलाईन मार्गे वाडयाकडे इच्छीत स्थळी जातील. तसेच एस. टी. बसेस चाविंद्रा जकात नाका येथे प्रवासी उतरवतील व तेथुनच प्रवासी भरून इच्छीत स्थळी जातील.

        प्रवेश बंद मुंबई-ठाणे कडुन जुना ठाणे आग्रा रोडने भिवंडी शहराकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना अंजुर फाटा येथे प्रवेश बंद' करण्यात येत आहे.

        पर्यायी मार्ग सदरची सर्व प्रकारची वाहने वसई रोड मार्गाने कारवली जकात नाका व विटभट्टी मार्गे इच्छित स्थळी जातील.

        प्रवेश बंद टी.एम.टी./एस.टी. बसेस व हलक्या वाहनांना नारपोली पो.स्टे. येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.    पर्यायी मार्ग टी.एम.टी./एस.टी. बसेस नारपोली पो.स्टे. येथे प्रवासी उतरवतील व तेथुनच प्रवासी भरून इच्छीत स्थळी जातील तसेच हलकी वाहने देवजीनगर अथवा साईनाथ सोसायटी कामतघर रोडने इच्छित स्थळी जातील.

        प्रवेश बंद खाडीपार कडून भिवंडी शहराकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड, अवजड, मध्यम वाहनांना अजयनगर येथे 'प्रवेश बंद' करण्यात येत आहे.

        पर्यायी मार्ग सदरची वाहने अजयनगर, गांजेगी हॉल मार्गे इच्छीत स्थळी जातील.

        नो पार्किंग दि. 19 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 16.00 ते 22.00 वाजेपावेतो कल्याण नाका- बागेफिरदोस - छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गावर रस्त्याचे दोन्ही बाजुस कोणतेही वाहने उभे करण्यास सक्त मनाई करण्यात येत आहे.

        सदरची अधिसूचना ही "गोपाळकाला" सणाच्या दिवशी म्हणजेच दि. 19 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 16.00 ते 22.00 पर्यंत अंमलात राहील. सदरची अधिसूचना ही पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडॉर, ऑक्सीजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त दत्तात्रय कांबळे यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!