मुंबईकरांना आता सायकल चालविण्याचा आनंद लुटता येणार

महापौर विश्वनाथ म्हाडेश्वर आणि आदित्य ठाकरेंच्या हस्ते मार्गिकेचा शुभारंभ

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने सायकलसाठी एअर इंडिया मुख्यालय (मरिन ड्राइव्ह) ते वरळी सी फेस ही ११. ५ किेलोमीटरची स्वतंत्र मार्गिका तयार केली असून, आज एअर इंडिया मुख्यालय (मरिन ड्राइव्ह ) ते गिरगाव चौपाटी या पाच कि.मी. रस्त्‍यावरील सायकलसाठी स्वतंत्र मार्गिकेचा शुभारंभ महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यात उपस्थितीत पार पडला. दर रविवारी ही मार्गिका विनाशुल्क खुली राहणार आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना सायकल चालविण्याचा आनंद लुटता येणार आहे.
मुंबईकर नागरिकांच्‍या धकाधकीच्या जीवनात शारिरीक तंदुरुस्ती‍साठी व प्रदुषणमुक्त मुंबईसाठी मुंबई महानगरपालिकेने सायकलसाठी सुरु केलेली स्वतंत्र मार्गिका अत्यंत उपयुक्त असल्‍याचे प्रतिपादन मुंबईचे महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी यावेळी केले. मुंबईकर नागरिकांचा प्रतिसाद बघून पुढील काळात ही मार्गिका नियमीत करायची का ? ते निश्चित करु असेही ते म्हणाले. महापालिकेने तातडीने ही मार्गिका सुरु केल्या्बद्दल आदित्य ठाकरे यांनी महापालिकेला धन्यवाद दिले. मुंबई पोलिसांचे सहकार्य यापुढेही असेच मिळेल असा विश्वास व्यक्त करुन सायकल चालविणे ही मुंबईकर नागरिकांची लोकचळवळ व्हावी, असा विश्वास व्यक्त केला.  याप्रसंगी समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख, महापालिका आयुक्तं अजोय मेहता, मुंबई पोलिस आयुक्त दतात्रय पडसलगीकर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) ए.एल. ज-हाड, उप आयुक्त रमेश पवार, ‘ ए’ विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर, ‘डी’ विभागाचे सहाय्यक आयुक्त विश्वास मोटे उपस्थि‍त होते.

उपनगरात सायकलसाठी स्वतंत्र मार्गिका
महापालिका आयुक्त अजोय मेहता म्हणाले की, मुंबईकर नागरिकांचा आज मिळालेला प्रतिसाद उत्तम असून यापुढील काळात पूर्व व पश्चिम उपनगरात लवकरच सायकलसाठी स्वतंत्र मार्गिका सुरु करु तसेच यामध्ये आणखी काही सुधारणा करता येईल का ? याचा विचार करुन चांगल्या सुधारणा करण्याचा निश्चित प्रयत्न करु असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. मुंबई पोलिस आयुक्त दतात्रय पडसलगीकर म्हणाले की, सायकलसाठी तयार करण्यात आलेल्या स्वतंत्र मार्गिकेच्या सुरक्षिततेसाठी महानगरपालिकेला सहकार्य करु तसेच वाहतूकीची शिस्त सांभाळण्याचा निश्चिंत प्रयत्न करु असे त्यांनी सांगितले. रविवार १० डिसेंबर २०१७ पासून नागरिकांसाठी ११. ५ किेलोमीटरची ही मार्गिका विनाशुल्क खुली होणार असून नागरिक याठिकाणी आपली स्वतःची सायकल आणून चालवू शकता तसेच शंभर रुपये तासाप्रमाणे याठिकाणी सायकल चालविण्यासाठी सुध्दा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांनी सायकल चालविण्याचा आनंद लुटावा असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आलय.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!