ग्राहकांकडून पेटीएमला पसंती : दिवाळीत १.६ अब्ज डॉलरपर्यंत भरारी
ऑफलाइन आणि ऑनलाइन देयकांमध्ये ३.५ पट वाढेची नोंद केली
मुंबई, : सॉफ्टबँक समर्थित भारतातील सर्वात मोठा मोबाइल पेमेंट आणि कॉमर्स मंच पेटीएमने दिवाळीच्या हंगामात (२० सप्टेंबर ते २० ऑक्टोबरपर्यंत) मंचावर १.६ अब्ज अमेरिकन डॉलर्सची पेमेंट करण्यात आल्याचे जाहीर केले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत याच कालावधीत अधिकाधिक ग्राहकांनी पेटीएम पेमेंट सेवेचा वापर केल्यामुळे उत्सवाच्या हंगामात मंचाने ऑनलाइन आणि ऑफलाइन देयकामध्ये ३.५ पट वाढ नोंदवली आहे.
पेटीएमने आपल्या सर्व देयकांमधील वापरांत आणि श्रेणींमध्ये वाढ नोंदवली असून यात खाद्य आउटलेट, वाहतूक आणि ऑफलाइन किरकोळ विक्रेते यांचे प्रमाण अधिक आहे. टियर २ असेच टियर ३ शहरांतील ग्राहकांमध्ये यावर्षी विक्रमी वाढ झाली असून त्यांचे प्रमाण ६० टक्के इतके आहे. नवी दिल्ली, मुंबई, बेंगळुरू आणि पुणे यासारख्या मोठ्या शहरांना पेमेंट व्यवहारातील या बदलाचा अनुभव आला आहे. आता हा ट्रेंड जयपूर, अहमदाबाद, म्हैसूर आणि विशाखापट्टणम यासारख्या लहान शहरांकडे वळला आहे आणि स्थानिक विक्रेत्यांचे ग्राहक त्यांच्या दैनंदिन जीवनाच्या खरेदी साठी पेटीएमचा मोठ्या प्रमाणावर वापर करत असल्याचे यातून निदर्शनास आले आहे. दिवाळी आणि भाऊबीज, शनिवार-रविवारच्या दिवशी हा कल पुन्हा एकदा अनुभवण्यात आला, ज्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत व्यवहारात २ पटीने वाढ झाली.
मोबाईल पेमेंट्सचा वापर वाढला
पेटीएम सीओओ किरण वासीरेड्डी म्हणाले की, “गेल्या काही तिमाहींमध्ये मोबाइल पेमेंट्सचा वापर वाढला वाढल्याचे दिसून आले आहे. सोयीनुसार आणि सुरक्षिततेमुळे, लोक कार्ड आणि इतर काही देयकांच्या तुलनेत पेटीएमला प्राधान्य देत आहेत. ऑफलाइन पेमेंट्समध्ये छोट्या शहरांमध्ये पेटीएमच्या वाढलेल्या वापरामुळे महिन्याभरात १.६ अब्ज अमेरिकन डॉलर्सचे व्यवहार नोंदविण्यात कंपनीला यश आले आहे. भारतातील मोबाइल पेमेंट्ससाठी ही सर्वात मोठी दिवाळी ठरली आहे. “