मुंबई : गेल्या २४ तासात राज्यात २ हजार ५८३ नव्या रुग्णांचे निदान झाले आहे असून ३ हजार ८३६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर एकूण २८ करोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.कालच्या तुलनेत आज करोना बाधित रूग्णांच्या संख्येत घट झाली असून मृत्यूची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे आजची स्थिती दिलासादायक ठरली आहे. मात्र सक्रीय रूग्ण संख्येत पुणे पहिल्या क्रमांकावर असून, ठाणे दुस-या क्रमांकावर आले आहे.

राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात २ हजार ५८३ इतक्या नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काल ही संख्या ३ हजार ४१३ इतकी होती. तर आज दिवसभरात एकूण ३ हजार ८३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. काल ही संख्या ८ हजार ३२६ इतकी होती. तर, आज २८ रुग्णांचा मृत्यू झाला. काल ही संख्या ४९ इतकी होती. आज राज्यात झालेल्या २८ रुग्णांच्या मृत्यूंनंतर राज्याच्या मृत्यूदर २.१२ टक्क्यांवर स्थिर आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ४० हजार ७२३ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.१८ टक्के इतके झाले आहे.

कुठे किती सक्रीय रूग्ण …

आज राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ४१ हजार ६७२ इतकी आहे. काल ही संख्या ४२ हजार ९९५ इतकी होती. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ११ हजार १९३ सक्रीय रूग्ण आहेत. त्याखालोखाल ठाणे जिल्ह्यात मात्र ही संख्या ५ हजार ७४८ आहे तर मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांच्या संख्या ५ हजार १०९ इतकी आहे. अहमदनगरमध्ये ५ हजार ५५१, साताऱ्यात ही संख्या ३ हजार, सांगलीत १ हजार ७३२, सोलापुरात २ हजार ३४७, पालघरमध्ये ४५८ रायगडमध्ये ८८०, रत्नागिरीत ६६३ , सिंधुदुर्गात ७६९ तर नाशिकमध्ये ९२९, औरंगाबादमध्ये ४१९, नागपूर जिल्ह्यात ही संख्या ११५ इतकी वाढली आहे. अमरावतीत ९५ आहे. तर राज्यात सर्वात कमी नंदुरबारमध्ये १ तर धुळयात २ सक्रिय रुग्ण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!