काँग्रेस कार्यालय तोडफोड प्रकरण : आठ मनसैनिकांना अखेर जामीन मंजूर
मुंबई : काँग्रेस कार्यालयाची तोडफोडप्रकरणी अटकेत असलेले मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह मनसेच्या आठ जणांना जामीन मंजूर झालाय. प्रत्येकी १५ हजाराच्या जातमुचलक्यावर यांना जामीन मिळालाय. मात्र एक महिन्याभर दर आठवड्याला आझाद मैदान पोलिस स्टेशनमध्ये हजेरी लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
मुंबई काँग्रेस ऑफिसच्या तोडफोडप्रकरणी पोलिसांनी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह संतोष धुरी, संतोष सरोदे, अभय मालप, योगेश चिले, विशाल कोकणे, हरिश सोळंकी, दिवाकर पडवळ यांना अटक केली होती. किला न्यायालयाने यांना पोलिस कोठडी आणि नंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आठही जणांची भायखळ्याच्या आर्थर रोड तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. अखेर आठही आज जणांना न्यायालयाने जामीन मंजूर केलाय.