एक्झिट पोलचा अंदाज काय ४ जूनच्या निकालाकडे लक्ष !
मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानाचा शेवटचा टप्पा आज संपला. ४ जूनला मतमोजणी होणार आहे, त्यामुळं सगळ्या देशाचं लक्ष आता ४ जूनकडे लागले आहे. नवीन संसदेत कुणाची सत्ता येंणार आहे. मोदी पंतप्रधान होणार का ? इंडिया आघाडीला किती जागा मिळतील,कोणाला पराभवाची धूळ चाखावी लागणार याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन मोठ्या प्रादेशिक पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर ही सगळ्यात मोठी सार्वत्रिक निवडणूक ठरल्याने महाराष्ट्रात नेमकं काय घडणार, याकडेही देशाचे लक्ष वेधले आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप, शिंदेंची शिवसेना, अजित पवारांची राष्ट्रवादी, रिपाइं आणि मनसे अशी महायुती तर दुसरीकडे काँग्रेस, उध्दव ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी अशी महाविकास आघाडी असा सामना रंगला हेाता. वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्रपणे उमेदवार उभे केले हेाते. मात्र त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही. खरी लढत महायुती विरूध्द महाविकास आघाडी अशीच झाली. मुंबई ठाण्यात शिवसेना विरूध्द शिवसेना असा सामना पाहायला मिळाला. सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जाहीर सभा, रॅली, प्रचारसभा घेऊन परिसर पिंजून काढला. मात्र मतदारांमध्ये फारसा उत्साह दिसून आला नाही. महाराष्ट्रातल्या या राजकीय बदलांचा नेमका काय परिणाम झाला हे ४ जूनला स्पष्ट होणार आहे. पण त्याआधीच देशभरातील सर्व एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात कोण किती जागा जिंकणार, याचा अंदाज वर्तवलाय. महाराष्ट्रात लोकसभेच्या महाराष्ट्रात एकूण ४८ जागा आहेत, त्यापैकी भाजप – २८, शिवसेना (एकनाथ शिंदे) – १५, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) -४, रासप (महादेव जानकर )- १ अशा महायुतीकडून जागा लढवल्या. तर शिवसेना (उद्धव ठाकरे) – २१ काँग्रेस – १७ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) – १० जागा लढवल्या. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार देशात एनडीएला अधिक जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीला अधिक जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
काय आहे महाराष्ट्रात एक्झिट पाेलचा अंदाज
एबीपी-सी व्होटर मविआ २३ तर महायुतीला २४ जागा TV9 पोलस्ट्राटच्या महायुती २२ आणि महाविकास आघाडी २५ इंडिया न्यूज डी डायनॅमिक्स महायुती – ३४ मविआ – १३, न्यूज २४ चाणक्य महायुती – ३३ तर मविआ – १५ रिपब्लिक भारत-मॅट्रीझ महायुती – ३० ते ३५ मविआ – १३ ते १९ जागा.
देशातील एक्झिट पोलचा अंदाज
टिव्ही ९ : एनडीए २१६ तर इंडिया १३४ आज तक : एनडीए १६१ ते १८० तर इंडिया ७९ ते १०० एबीपी : एनडीए २२७ ते २६९, इंडिया ११८ ते १५५ इंडिया टिव्ही सीएनएक्स : एनडीए ३७१ ते ४०१ तर इंडिया १०९ ते १३९ न्यूज १८ : एनडीए २५५ ते २७० आणि इंडिया १११ ते १२६ रिपब्लिक टिव्ही : एनडीए ३५९ तर इंडिया १५४ न्यूज नेशन : एनडीए ३४२ ते ३४८ तर इंडिया १५३ ते १६
२०१९ चा एक्झिट पोलचा अंदाज चुकला होता.
२०१९ लोकसभा निवडणूक निकालाआधी आलेला एक्झिट पोलचा अंदाज पूर्णपणे चुकला होता. एक्झिटपोलच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात भाजप-शिवसेना आघाडीला ३६ ते ३८ जाग मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण निकालानंतर महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला ४१ जागांवर यश मिळाले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला एक्झिट पोलमध्ये १० ते ११ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण काँग्रेस-राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या.——————-