कर्नाटक : संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात झाली आहे. कर्नाटका कोणाची सत्ता येणार ?
काँग्रेस बाजी मारणार? की भाजप सत्तेत कायम राहणार? याचा फैसला आज होणार आहे.

कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी १० मे रोजी मतदान झालं होतं. निवडणुकीसाठी एकूण २ हजार ६१५ उमेदवार उभे आहेत. त्यामध्ये २ हजार ४३० पुरुष, तर १८४ महिला उमेदवार आणि एक तृतीयपंधी उमेदवाराचा समावेश आहे. या निवडणुकीत ७२.६७ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला होता. राज्यभरातील ३६ केंद्रांवर सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असून, दुपारपर्यंत राज्यातील भविष्यातील राजकीय चित्र स्पष्ट होईल.

कर्नाटकात भाजप आणि काँग्रेसमध्ये मुख्य लढत असल्याने या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

बेळगाव जिल्ह्यात अठरा जागा आहेतं. दुपारी दोन वाजेपर्यंत सगळे निकाल जाहीर होतील असे सांगितले जात आहेत.

हे कर्नाटक चे वैशिष्ट…

कर्नाटक या राज्याचे वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत इथल्या जनतेने सलग दोन वेळा कोणत्याही राजकीय पक्षाकडे सत्ता सोपवली नाही. दर पाच वर्षांनी राज्यात सत्ताबदल होतोय.

कर्नाटकमधील दिग्गज नेते उभे असलेले ७ मतदारसंघ

१. शिग्गाव – बसवराज बोम्मई बीजेपी – यासिर अहमद खान पठाण काँग्रेस

२. हुबळी धारवाड मध्य – जगदीश शेट्टर काँग्रेस – महेश तेंगीनाकाई भाजपा

३. कनकपुरा – डी. के. शिवकुमार (काँग्रेस) – आर. अशोक (भाजपा)

४. चन्नापट्टन – एच. डी. कुमारस्वामी जेडीएस – सी. पी. योगेश्वर भाजपा

५. चित्तपूर – प्रियांक खरगे काँग्रेस – मणिकंता राठोड भाजपा

६. अथणी – लक्ष्मण सवदी काँग्रेस – महेश कुमथल्ली भाजपा – शशिकांत पडसलगी जेडीएस

७. वरुणा – सिद्धरामय्या काँग्रेस – व्ही सोमन्ना भाजप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!