कल्याण : .. कल्याण डोंबिवलीत करोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून, आतापर्यंतचा रुग्णाचा आकडा 40 हजार पार गेला आहे. ठाणे जिल्हातील हा सर्वाधिक आकडा असल्याने चिंता व्यक्त होत आहे. मात्र टेस्टिंग वाढल्याने रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
डॉ. प्रतिभा पानपाटील वैद्यकीय अधिकारी केडीएमसी
ठाणे जिल्ह्यातील कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाचा कहर वाढल्याचा आकडेवारीवरून दिसून येत आहे. गेल्या महिनाभरात रुगणाच्या संख्येत खूपच वाढ झाली आहे. आतापर्यंत 35277 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या 4672 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर आतापर्यंत 801 रुग्णाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.
अनलॉकमुळे आणि गणपती उत्सवानंतर रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे टेस्टिंग वाढविण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 1 लाख 19 हजार टेस्टिंग करण्यात आल्या आहेत. खाजगी वैदयकीय व्यावसायिक आहेत त्याठिकाणी तापाच्या रूग्णांची टेस्टिंग केली जात आहे त्यांना आयसोलेटेट केलं जातंय. तिथला पॉझिटिव्हीटी रेट जास्त असल्याने ही रुग्णांची वाढ दिसून येतय. मात्र रुग्णाचा आकडा वाढत असला तरीसुद्धा डिस्चार्ज रेटही जास्त आहे तसेच मृत्यू दरही कमी आहे असे पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले. *****