मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत आपल्या वादग्रस्त वक्तव्याने पून्हा एकदा वादाच्या भोव़यात सापडलीय १९४७ चे स्वातंत्र्य भीक मागून मिळाले होते, खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले,’ असे वादग्रस्त वक्तव्य कंगणाने केलय तिच्या या वक्तव्याने देशभरात संताप व्यक्त होत असून कंगणाने स्वातंत्र सैनिकांचा अपमान केला असून तिच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी होत आहे सोशल मिडीयावर कंगना राणावतच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला जात आहे. # कंगनापद्मश्रीवापस_करो …..असा ट्विटरवर ट्रेंडींग सुरू आहे.
टाइम्स नाऊच्या संपादक नाविका कुमार यांना दिलेल्या एका मुलाखतीत कंगनानं हे वक्तव्य केलय कंगनाच्या वक्तव्यावर अनेक राजकीय प्रतिक्रियादेखील येत आहेत. भाजप खासदार वरुण गांधी यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “कधी महात्मा गांधींच्या त्याग आणि साधनेचा अपमान, कधी त्यांच्या मारेकऱ्यांचा गौरव आणि आता शहीद मंगल पांडे पासून राणी लक्ष्मीबाई, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाष चंद्र बोस आणि लाखो स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग आणि बलिदानाबाबत द्वेष. या विचारसरणीला वेडेपणा म्हणावं की देशद्रोह?” असं ट्विट वरुण गांधींनी केलं आहे. शिवसेनेच्या नेत्या निलम गोऱ्हे यांनीही कंगनाचा पद्म पुरस्कार रद्द करून तिच्यावर देशद्रोहाचा खटला चालवा अशी मागणी केलीय