कल्याण : कल्याणच्या खडेगोळवली परिसरातील काही भागात दुषित पाण्यामुळे तब्बल ४० नागरिकांना उलटया आणि जुलाब आदींचा त्रास झाला, त्यामुळे त्यांच्यावर नजीकच्या आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले मात्र या प्रकारानंतर पालिका अधिका-यांनी परिसरात जाऊन पाहणी केली.
खडेगोळवलीमधील रामा कृष्णा कॉलनी, पार्वती नगर, श्री मलंग कॉलनी परिसरात चार -पाच दिवसापासून दुषीत पाणी येत असल्याचे नागरिकांनी सांगितले. दुषीत पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून त्याचा त्रास जवळपास ४० नागरिकांना झाला. स्थानिक नागरिकांनी पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडे तक्रार केल्यानंतर आज कर्मचा-यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी माजी नगरसेवक प्रकाश तरे हे देखील उपस्थित होते. दुषित पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच पाण्याच्या पाईन लाईन फुटून त्यामध्ये दुषित पाणी मिळसत आहे का ? याचीही तपासणी करण्यात येणार असल्याचे पालिकेच्या अधिका-यांनी सांगितले.