ठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावर पडघा जवळील खडवली फाटयाजवळ भीषण अपघात झाला आहे. कंटेनर चालकाचा वाहनावरीला ताबा सुटल्यामुळे कंटेनरने कारला मागच्या बाजूस जोरदार धडक दिली. त्यानंतर या कंटेनर चालकाने कारला फरफटत नेलं. पुढे रस्त्याच्या कडेला असलेल्या एका आईस्क्रीमच्या टेम्पोलाही त्याने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एकाचा जणांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.

मौजम फायाजऊल्ल हुसेन अन्सारीव (वय वर्षे 31) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर चैतन्य कासने (वय 24) , नशिर अली अबु अन्सारी (वय 33) , जयेश बाळाराम सपाट (वय 25) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई-नाशिक महामार्गावर पडघा नजिक खडवली फाट्याजवळ एक भरधाव कंटेनर जात असतांना यावेळी चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले. यावेळी या कंटेनरने एका कारला पाठीमागून जोरदार धडक देत काही अंतरापर्यंत फरफट नेले. तसेच रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका आईस्क्रीमच्या टेम्पोला देखील जोरदार धडक देत दोन ते तीन दुचाकींना चिरडले. दरम्यान, आइसक्रीम खात असलेले दोन ते तीन जण कंटेनर खाली आले. यातील एकाच मृत्यू झाला तर तिघे जण जखमी झाले. गंभीर जखमींना येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर कंटेनर चालक पळून गेला होता. दरम्यान, पोलिसांनी त्याला अटक केली असून गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *