डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ आणि भिवंडीत काँग्रेस च्या प्रचाराचा झंझावात 
कल्याण : विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस च्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अखिल भारतीय काँग्रेस चे  सेक्रेटरी व कोकणचे प्रभारी बी. एन. संदीप यांनी शुक्रवारी डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ आणि भिवंडी विधानसभा मतदार संघात झंझावात प्रचार केला. यावेळी त्यांच्यासोबत आगरी कोळी भूमीपुत्रांचे नेते आणि काँग्रेस चे कोकण विभागाचे समनव्यक संतोष केणे  यांच्यासह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
डोंबिवली विधानसभा मतदार संघाच्या काँग्रेस उमेदवार राधिका गुप्ते, कल्याण पश्चिमच्या उमेदवार कांचन कुलकर्णी, अंबरनाथ विधानसभेचे उमेदवार रोहित साळवे, भिवंडी पूर्व चे उमेदवार संतोष शेट्टी, भिवंडी पश्चिम उमेदवार शोएब (गुड्डू) असिफ खान यांच्या प्रचार कार्यालयाचे उदघाटन आणि प्रचार सभा घेण्यात आली. तसेच उल्हासनगर आणि कल्याण पूर्वतील राष्ट्रवादीचे उमेदवार असल्याने आघाडी धर्म पाळण्याचे आवाहन करण्यात आले. आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहनही बी एन संदीप आणि संतोष केणे यांनी केले.
——

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *