काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त दक्षिण मुंबई युवा काँग्रेसची पदयात्रा
घाटकोपर : भारतीय काँग्रेसच्या 133 व्या वर्धापन दिनानिमित्त आज देशभर युवा काँग्रेसच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले . दक्षिण मुंबई युवा काँग्रेसच्या वतीने आझाद मैदान ते तेजपाल हॉल पर्यंत पदयात्रेचे आयोजन करण्यात आले . सकाळी 9 वाजता ही पदयात्रा सुरू करण्यात आली . युवा काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले होते . कार्यकर्त्यांनी यावेळी काँग्रेसचा ध्वज फडकवत सलामी देत पदयात्रा सुरू केली . पक्षाचा वर्धापन दिवस आणि काँग्रेसच्या अध्यक्ष पदी राहुल गांधी यांची निवड झाल्या नंतर युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा हा पहिलाच कार्यक्रम असून यापुढे असे अनेक आदर्श उपक्रम आम्ही सुरू करणार असल्याचे युवा काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरज सिंग ठाकूर यांनी सांगितले . यावेळी सुधाशु भट्ट , अखिल भारतीय युवा काँग्रेसचे मुंबई प्रभारी पृथ्वी जोशी , अस्लम शेख आदी उपस्थित होते .