डोंबिवली : महाराष्ट्रामध्ये आता विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यात काँग्रेसचे इच्छुक उमेदवारांची मुलाखत राज्यसभा तथा खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी आज कल्याणमध्ये घेतली. आतापर्यंत 95 इच्छुक उमेदवारांची मुलाखत घेण्यात आली आहे, ज्यामध्ये भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 18 इच्छुक आहेत.
हंडोरे यांनी कार्यकर्त्यांच्या क्षमतांबद्दल सकारात्मक दृष्टिकोन व्यक्त केला आणि निवडणुकीच्या तयारीवर जोर देण्यावर भर दिला असुन भिवंडी, अंबरनाथ, आणि कल्याण मतदारसंघांमध्ये इच्छुक उमेदवारांची संख्या उच्च असून, कार्यकर्त्यांनी त्यांच्या कामात कुशलता दाखवली आहे. हंडोरे यांनी सांगितले की, शीट शेयरिंग प्रक्रियेच्या पूर्णतेनंतरच उमेदवार निश्चित केले जातील.
तसेच विधानसभा निवडणुक लढवण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून ठाणे जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी ताकद आहे अशी भावना काँग्रेस कार्यकर्त्यांनी व्यक्त केली तर लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला मिळालेला यश पाहता कार्यकर्त्यांमध्ये जोश आहे. त्याच्याही विचार महाविकास आघाडीचे वरिष्ठ नेते करतील असाही विश्वास हंडोरे यांनी व्यक्त केला आहे
यावेळी खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी सांगितले की, आज सकाळपासून ठाणे जिल्ह्यातील काँग्रेसचे इच्छूक उमेदवारांची मुलाखत सुरू आहे, कार्यकर्ते अत्यंत सक्षमपणे काम करताय. चांगल्या कार्यकर्त्यांच्या जाळ मला या ठाणे जिल्ह्यामध्ये दिसतंय. मुलाखतीच्या माध्यमातून त्यांच्यात कौशल्य, निवडणूक लढवायची त्यांची कार्यक्षमता आणि संगठन बांधणी… त्याच्यामध्ये BLO, BLA तयार करणे, बुथवरचे सर्व कमेट्या तयार करणं आणि निश्चितपणे महाविकास आघाडी या ठाणे जिल्ह्यामध्ये अत्यंत जोरदारपणे मुसंडी मारेल, अशी अपेक्षा या निमित्ताने मला बाळगता येईल. तीन पक्षाचे अजूनही शीट शेयरिंगचे काम सुरू आहे. ते झाल्यानंतरच कुठला मतदारसंघात कोणाला उमेदवारी देयाची आमच्या पक्षाचे नेते करतील. भिवंडी मतदारसंघाची जास्ती मागणी आहे, अंबरनाथ, कल्याण पूर्व-पश्चिम ची मागणी जोरात आहे.
इच्छुक उमेदवारांची संख्या खालीलप्रमाणे:
भिवंडी पश्चिम: 18
मुरबाड: 4
भिवंडी पूर्व: 3
शाहपुर: 2
अंबरनाथ: 8
बदलापूर: 3
उल्हासनगर: 3
डोंबिवली: 3
कल्याण ग्रामीण: 1
कल्याण पूर्व: 2
कल्याण पश्चिम: 6