डोंबिवली : आगामी कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जययत तयारीला सुरुवात झाली आहे. कॉग्रेसकडूनही डोंबिवलीत आढावा बैठक पार पडली. यावेळी कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून कामाला लागा, सर सामान्य नागरिक च्या समस्या सोडविण्यावर भर द्यावा असे आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात आलं.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस चे सचिव संतोष केणे यांच्या डोंबिवलीतील आयरेरोड येथील कार्यालयात आढावा बैठक पार पडली. यावेळी त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पालिका पक्ष संघटना आणि पालिका निवडणुकीची तयारी याचा आढावा घेण्यात आला. केडीएमसीत काँग्रेसची अवस्था खूपच खराब आहे. पालिकेत काँग्रेसचे अवघे 3 नगरसेवक आहेत. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी महाविकास आघाडीची सत्ता आहे. त्यामुळे पालिकेत सत्ता मिळविण्यासाठी सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी झोकून काम केले पाहिजे, तसेच स्थानिक पातळीवर, वार्ड निमित्य स्थापन करून पक्ष संघटना वाढविण्यावर भर फील पाहिजे तसेच सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्यावर भर द्यावा असे आवाहन केणे यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले. यावेळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली.——-