निस्वार्थी राजकारण, कोणत्याही पदाची, पैशाची नसलेली लालसा, सत्ता असो वा नसो काम क0रीत राहणे आणि जनसामान्यांचे प्रश्न मार्गी लावणे असं कॉग्रेसमधील लढाऊ नेतृत्व म्हणजे डोंबिवलीतील काँग्रेसचे नेते संतोष दादा केणे ! गेल्या २० वर्षापासून ते अध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत. नाथसंप्रदाय उपासक आहेत. त्यांच्या घरात परंपरागत शिवाची उपासना केली जाते. प. पू .योगी ज्ञाननाथजी रानडे नाथपंथीय यांच्या अनुग्रहित शिष्य म्हणूनही काम करीत आहेत. २००२ साली त्यांनी आयरे येथे नागेश्वर मंदिराची स्थापना केली. त्याठिकाणी नागसंप्रदाय उपासना केली जाते. आदिनाथ शंकरापासून मच्छिंद्रनाथ गोरक्ष, गहिणीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानदेव नाथपंथीय पासून ते वारकरी संप्रदाय उपासना व जेापासणा केली जाते. मंदिरात ज्ञानधारणा, भजन किर्तन, मानसपूजा, पारायण अनेक सांप्रदायिक का toर्यक्रम साजरे केले जातात. महाशिवरात्रीचा मोठा उत्सव साजरा केला जातो तर दुस- या दिवशी भंडाराचे आयोजन केले जाते. हजारो भक्तगण त्याचा दर्शनाचा लाभ घेतात. त्यामुळे राजकारण समाजकारणा बरोबरच अध्यात्मिक क्षेत्रातही ते कार्यरत आहेत.
आयरे गावातील संतोष केणे यांचे कुटूंब हे काँग्रेसचे जुने घराणे म्हणूनच ओळखले जाते. त्यांची आजी आयरे ग्रामपंचायतीची सदस्य होती, तर काका हे बारा वर्षे सरपंच होते. यूथ काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणूनच संतोषदादा केणे यांच्या राजकीय वाटचालीस सुरूवात झाली. १९९५ ला केडीएमसीची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. त्यावेळी आयरे परिसरातून ते दोन टर्म नगरसेवक म्हणून निवडून आले. पालिकेतील काँग्रेसचा गटनेता म्हणून त्यांनी ठसा उमटविला. विरोधी पक्षात असल्याने महासभेत विविध विषयांवर सडेतोडपणे मते मांडून सत्ताधारी शिवसेना भाजपला सळो कि पळो करून सोडले. १९९८ मध्ये त्यांच्यावर युथ काँगेसच्या कल्याण जिल्हा अध्यक्षपदाची धुरा सोपविली. युवकांची संघटना बांधल्यानंतर त्यांच्यातील वक्तृत्व, नेतृत्व या गुणांमुळे पक्षाने त्यांना काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात आणून ओबीसी सेलचे महाराष्ट्र समन्वयकपदी नियुक्ती केली. त्यानंतर वसई, कर्जत पालघर येथे निरीक्षक म्हणूनही पाठवले. गेली अनेक वर्षे प्रदेश प्रतिनिधी काम पाहिल्यानंतर आता प्रदेश सचिव पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. कॉग्रेस प्रशासकीय पातळीवरही त्यांची काम करण्याची पध्दत पाहून अधिकारी वर्गात मैत्रीपूर्ण संबध व दबदबा आहे.
आगरी कोळी समाजाचा नेता …
आगरी कोळी भूमीपुत्र महासंघाचे सल्लागार म्हणून संतोषदादा केणे हे काम करीत आहेत. ठाणे, रायगड, पालघर, नवी मुंबई, मुंबई आणि कोकण प्रदेश अशा सात सागरी जिल्हयातील भूमीपुत्रांच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहेत. त्यामुळे काँग्रेसचे कोकणातील नेतृत्व म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं.भूमीपुत्रांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. कल्याण ग्रामीण परिसरातील नेवाळीचा प्रश्न असो वा २७ गावातील ग्रोथ सेंटर, डेडीकेट फ्रेड कॉरीडॉर, बुलेट ट्रेन, बाळकूममधील क्लस्टर यासाठी केंद्र व राज्य सरकाच्या विविध प्रकल्पात भूमीपुत्रांच्या जमीनी बाधित होत आहेत. विकासाला अडथळा नाही, पण भूमीपुत्रांना त्यांच्या हक्काचा मोबदला मिळाला पाहिजे अशी भूमिका घेत भूमीपुत्रांच्या न्याय हक्कासाठी त्यांचा आवाज म्हणून सरकारशी सर्वच पातळीवर लढत आहेत. प्रिमीअर कंपनीच्या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. नवी मुंबई विमानतळाला दि, बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी सरकारने मान्य केली आहे. त्यामुळे आगरी कोळी समाजाच्या न्याय हक्कासाठी झगडणारा एक नेता म्हणूनच त्यांच्याकड पाहिलं जातं. भूमीपुत्रांवर अन्याय झाला की त्यांच्यासाठी धावून जाणार हक्काचा नेता म्हणूनही आगरी कोळी समाजात त्यांची ओळख आहे. पक्षीय भेदभाव न बाळगता सर्वांची कामे ते करतात, त्यामुळे सर्वच पक्षात त्याचे स्नेहाचे संबंध आहेत. लोकांच्या हितासाठी झटणे आणि त्यांच्या समस्या सोडविणे हाच त्यांचा स्वभाव आहे. करोनाच्या काळातही त्यांनी अनेकांना मदत केली. अडचणीत सापडलेल्या मग तो कोणीही कुठल्याही पक्षातील जाती धर्माचा असो, एखादया मोठया भावाप्रमाणे पाठीशी उभे राहून त्यांच्या अडीअडचणी सोडवणे त्याला मदत करणे हा त्यांचा स्थायी भाव आहे. त्यामुळेच ” दादा ” म्हणूनच सर्वांचे परिचीत आहेत. ८० टक्के समाजकारण, अध्यात्म आणि २० टक्के राजकारण असे ब्रीद वाक्य मनाशी ठेवून संतोषदादा केणे काम करीत आहेत. जनमाणसाचे प्रश्न असो, २६/११ चा दहशत वाद्यांविरोधात गेट वे ऑफ इंडिया ते इंडिया गेट रॅली असो, सामाजिक अध्यात्मिक अथवा राजकीय सभा, कार्यक्रम असो अथवा एखाद्या कार्यकत्यांवर झालेला अन्याय असो वा आगरी कोळी समाजाचे प्रश्न असो ते हिरीरीने पुढे असतात. त्यामुळे आगरी कोळी समाज त्यांच्या मागे आहेच मात्र त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ असा त्यांचा स्वभाव आहे. निवडणुकीच्या काळात पक्षाने दिलेली जबाबदारी नेटाने पार पाडीत, पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे काम करणे ही त्यांच्या कामाची पध्दत आहे. त्यांच आणखी एक वैशिष्टय म्हणजे ते कुटुंबवत्सल आहेत.
चौथी पिढी काँग्रेसमध्ये कार्यरत
संतोष दादा केणे यांच्या कुटुंबातील चौथी पिढी काँग्रेस मध्ये कार्यरत आहे. काँग्रेस मधील एक निष्ठावंत कुटुंब म्हणूनही त्यांची ओळख आहे.वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवून राहूल आणि प्रणव ही त्यांची दोन्ही मुले समाजकारण, अध्यात्म आणि राजकारणात कार्य करीत आहेत. संतोष दादा केणे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सामाजिक राजकीय आणि अध्यात्मिक जीवनावर प्रकाश टाकण्याचा केलेला लहानसा प्रयत्न. दादांना उदंड आयुष्य लाभो, आणि त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा…
——-