जनसामान्यांच नेतृत्व ……संतोष दादा केणे ! 

विधानसभा निवडणूका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे सर्वत्रच राजकीय वातावरण तापलं आहे. एका पक्षातून दुस-या पक्षात जाण्याची चढाओढ सुरू आहे. सध्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजप शिवसेनेत जाण्यासाठी राजकारण्यांमध्ये जणूकाय स्पर्धा लागली आहे . पण प्रत्येक पक्षात निष्ठावंत मंडळी असतात, तसंच काँग्रेस पक्षातही आहेत. डोंबिवलीतील संतोष केणे हे त्या निष्ठावंतापैकीच एक नाव आहे. सध्या काँग्रेसची पिछेहाट झाली आहे. पण पडत्या काळात पक्षाला सावरण्याचे, उभारी देण्यासाठी बूथ पातळीपासून ते प्रदेश पातळीपर्यंत कार्यकत्यांची मोट बांधण्याचे काम संतोष केणे करताना दिसत आहेत. निस्वार्थी राजकारण, कोणत्याही पदाची, पैशाची लालसा नसलेले सत्ता असो वा नसो काम करीत राहणे, लोकांचे प्रश्न सोडविणे हाच त्यांचा स्वभाव आहे. अडचणीत सापडलेल्या मग तो कोणीही कुठल्याही पक्षातील जाती धर्माचा असो, एखादया मोठया भावाप्रमाणे पाठीशी उभे राहून त्यांच्या अडीअडचणी सोडवणे त्याला मदत करणे हा त्यांचा स्थायी भाव आहे. त्यामुळेच ” दादा ” म्हणूनच सर्वांचे परिचीत आहेत.

आयरे गावातील संतोष केणे यांचे कुटूंब हे काँग्रेसचे जुने घराणे म्हणूनच ओळखले जाते. त्यांची आजी आयरे ग्रामपंचायतीची सदस्य होती तर काका हे बारा वर्षे सरपंच होते. यूथ काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणूनच संतोष केणे यांच्या राजकीय वाटचालीस सुरूवात झाली. १९९५ ला केडीएमसीची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. त्यावेळी आयरे परिसरातून ते दोन टर्म नगरसेवक म्हणून निवडून आले. पालिकेतील काँग्रेसचा गटनेता म्हणून त्यांनी ठसा उमटविला. विरोधी पक्षात असल्याने महासभेत विविध विषयांवर सडेतोडपणे मते मांडून सत्ताधारी शिवसेना भाजपला सळो कि पळो करून सोडले. १९९८ मध्ये त्यांच्यावर युथ काँगेसच्या कल्याण जिल्हा अध्यक्षपदाची धुरा सोपविली. युवकांची संघटना बांधल्यानंतर त्यांच्यातील वक्तृत्व, नेतृत्व या गुणांमुळे पक्षाने त्यांना काँग्रेसच्या मुख्य प्रवाहात आणून ओबीसी सेलचे महाराष्ट्र समन्वयकपदी नियुक्ती केली. त्यानंतर वसई, कर्जत पालघर येथे निरीक्षक म्हणूनही पाठवले. काँग्रेसची सत्ता असताना सरकारच्या विविध योजना जनमाणसात पर्यंत पोहचून त्यांना लाभ मिळवून देण्यात त्याचा हातखंडा असायचा. गेली अनेक वर्षे प्रदेश प्रतिनिधी काम पाहिल्यानंतर आता प्रदेश सचिव पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. प्रशासकीय पातळीवरही त्यांची काम करण्याची पध्दत पाहून अधिकारी वर्गात मैत्रीपूर्ण संबध व दबदबा आहे.

आगरी कोळी समाजाचा नेता …

आगरी कोळी भूमीपुत्र महासंघाचे सल्लागार म्हणून संतोष केणे हे काम करीत आहेत. ठाणे, रायगड, पालघर, नवी मुंबई, मुंबई आणि कोकण प्रदेश अशा सात सागरी जिल्हयातील भूमीपुत्रांच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहेत. भूमीपुत्रांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात. कल्याण ग्रामीण परिसरातील नेवाळीचा प्रश्न असो वा २७ गावातील ग्रोथ सेंटर, डेडीकेट फ्रेड कॉरीडॉर, बुलेट ट्रेन, बाळकूममधील क्लस्टर यासाठी केंद्र व राज्य सरकाच्या विविध प्रकल्पात भूमीपुत्रांच्या जमीनी बाधित होत आहेत. विकासाला अडथळा नाही, पण भूमीपुत्रांना त्यांच्या हक्काचा मोबदला मिळाला पाहिजे अशी भूमिका घेत संतोष केणे हे भूमीपुत्रांच्या न्याय हक्कासाठी त्यांचा आवाज म्हणून सरकारशी सर्वच पातळीवर लढत आहेत. प्रिमीअर कंपनीच्या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. नवी मुंबई विमानतळाला दि, बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी सरकारने मान्य केली आहे. त्यामुळे आगरी कोळी समाजाच्या न्याय हक्कासाठी झगडणारा एक नेता म्हणूनच त्यांच्याकड पाहिलं जातं.

नाथपंथीय पासून ते वारकरी संप्रदायचे उपासक    …

संतोष केणे हे २० वर्षापासून अध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत आहेत. यांच्या घरात परंपरागत शिवाची उपासना केली जाते. प पू योगी ज्ञाननाथजी रानडे नाथपंथीय यांच्या अनुग्रहित शिष्य म्हणूनही काम करीत आहेत. २००२ साली त्यांनी आयरे येथे नागेश्वर मंदिराची स्थापना केली. त्याठिकाणी नागसंप्रदाय उपासना केली जाते. आदिनाथ शंकरापासून मच्छिंद्रनाथ गोरक्ष, गहिणीनाथ, निवृत्तीनाथ, ज्ञानदेव नाथपंथीय पासून ते वारकरी संप्रदाय उपासना व जेापासणा केली जाते. मंदिरात ज्ञानधारणा, भजन किर्तन, मानसपूजा, पारायण अनेक सांप्रदायिक कार्यक्रम साजरे केले जातात. महाशिवरात्रीचा मोठा उत्सव साजरा केला जातो तर दुस- या दिवशी भंडाराचे आयोजन केले जाते. हजारो भक्तगण त्याचा दर्शनाचा लाभ घेतात. त्यामुळे राजकारण समाजकारणाबरोबरच अध्यात्मिक सांगड संतोष केणे यांच्यावर आहे.

८० टक्के समाजकारण, अध्यात्म आणि २० टक्के राजकारण असे ब्रीद वाक्य मनाशी ठेवून संतोष केणे काम करीत आहेत. जनमाणसाचे प्रश्न असो, २६/११ चा दहशत वाद्यांविरोधात गेट वे ऑफ इंडिया ते इंडिया गेट रॅली असो, सामाजिक अध्यात्मिक अथवा राजकीय सभा, कार्यक्रम असो अथवा एखाद्या कार्यकत्यांवर झालेला अन्याय असो वा आगरी कोळी समाजाचे प्रश्न असो संतोष केणे हे हिरीरीने पुढे असतात. त्यामुळे आगरी कोळी समाज त्यांच्या मागे आहेच मात्र त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. तोंडात साखर आणि डोक्यावर बर्फ असा त्यांचा स्वभाव आहे. निवडणुकीच्या काळात पक्षाने दिलेली जबाबदारी नेटाने पार पाडीत, पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे काम करणे ही त्यांच्या कामाची पध्दत आहे. त्यांच आणखी एक वैशिष्टय म्हणजे ते कुटुंबवत्सल आहेत.

चौथी पिढीही काँग्रेसमध्ये कार्यरत …

केणे कुटुंबातील चौथी पिढी काँग्रेस मध्ये कार्यरत आहे.     वडीलांच्या  पावलावर पाऊल ठेवून राहूल आणि प्रणव ही त्यांची दोन्ही मुले समाजकारण अध्यात्म आणि राजकारणात कार्य करीत आहेत. संतोष केणे म्हणजेच सर्वांचे ” दादा ” यांचा आज ५४ वा वाढदिवस साजरा होत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या सामाजिक राजकीय आणि अध्यात्मिक जीवनावर प्रकाश टाकण्याचा केलेला लहानसा प्रयत्न आहे. दादांना उदंड आयुष्य लाभो, आणि त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा…
——-
संतोष गायकवाड (डोंबिवली)

(प्रतिक्रिया)

राजकारणाशी संबधित असले तरीसुध्दा राजकारण कमी आणि समाजकारण जास्त समाजाच्या हितासाठी बाजू मांडतात असेच गुण त्यांच्यात आहेत. समाजाच्या पक्षासाठी खंबीरपणे उभे राहून बाजू मांडतात असे हे व्यक्तिमत्व आहे. वेगवेगळया आंदोलनात कार्यक्रमात ते नेहमीच सक्रीय होऊन सामाजिक आणि परमार्थ काम करतात. संतोष केणे यांचे अष्टपैलू नेतृत्व आहे.  (गणेश म्हात्रे )
————–

संतोष केणे यांच्या नावातच समाधान आहे. अपेक्षारहित सामाजिक शैक्षणिक अध्यात्मिक आणि राजकीय कार्यात स्वत:ला झोकून देणारे व्यक्तीमत्व म्हणजे संतोष केणे. ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर काही क्षणाकरीता स्वत:चे दु:ख समोरील व्यक्ती विसरून जाते. कारण एकच त्यांच्या चेह-यावर नेहमी स्मितहास्य असते. अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारे अन्यायाविरूध्द लढणारे सर्वांमध्ये चैतन्य जोश जोम भरणारे म्हणजे संतोष केणे. सर्वच पक्षातील प्रेम करतात त्याला एकच कारण म्हणजे तुमचा गोड स्वभाव व हसरा चेहरा. कुणाचीही समस्या अडचण असेल मग तो कुठल्याही धर्माचा पक्षाचा असा भेदभाव न ठेवता त्याच्यासाठी धावून जाणारे व्यक्तीमत्व म्हणजे संतोष केणे आहेत. अर्थकारण राजकारण बाजूला ठेवून समाज कार्यातून लोकांच्या मनात तुमची उज्वल प्रतिमा उमटविली आहे बाळकूम ग्रामस्थ शेतकरी सामाजिक संस्थेच्या वतीने वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा …(पुंडलिक वाडेकर, बाळकूम )
————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *