काँग्रेसचा सरकारविरेाधातील जनआक्रोश शनिवारी महाडमध्ये 

महाड (निलेश पवार ) –बेरोजगारी, जीएसटी या विरोधात काँग्रेसच्यावतीने जनआक्रोश आंदोलन पुकारले आहे. कोकण प्रदेशचे हे आंदोलन शनिवारी ४ नोव्हेंबर रोजी महाडमध्ये होत असून, महाडमधील भिलारे मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती  महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस माणिकराव जगताप यांनी दिली.   याप्रसंगी काँग्रेस  पक्षाचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, मोहन प्रकाश, हुसैन दलवाई, आदी कॉंग्रेस नेते उपस्थित राहणार आहेत. या सभेला ठाणे ते सिंधुदुर्ग पर्यंत चे कार्यकर्ते आणि जनता उपस्थित राहणार आहे.

केंद्र आणि राज्य सरकारने घेतलेल्या विविध निर्णयामुळे देश आणि राज्यात निर्माण झालेला आर्थिक प्रश्न, वाढलेली बेरोजगारी, आणि सरकारने जाहीर केलेल्या असफल योजना या विरोधात जनता संतापलेली आहे. कॉंग्रेस ने जनतेच्या न्याय हक्कासाठी आता जनआक्रोश उभा केला आहे. संपूर्ण देशभरात हे आंदोलन होत असून कोकणातील हे आंदोलन महाड क्रांतीभूमीत आयोजित केल्याची माहिती  जगताप यांनी दिलीय. केंद्र सरकारने जनतेवर लादलेला जी.एस.टी. अद्याप सी.ए.ला कळलेला नाही यामुळे देश आणि राज्यात विविध उद्योग, व्यवसाय धोक्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणात बेकारी निर्माण झाली आहे. शासनाने घेतलेले निर्णय जनतेला त्रासदायक ठरले आहेत. एकीकडे शेतकरी कर्ज माफी केली मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना कर्ज माफ झालेले नाही, ऑनलाईन व्यवहारात शेतकरी, ग्रामीण जनता त्रासली आहे असे माणिकराव जगताप यांनी सांगून सरकारने विविध मार्गाने होणारी करवसुली थांबवली असल्याने सरकारला उत्पन्न होणार कोठून यामुळे सरकारचे देखील आर्थिक गणित ढासळत आहे. यामुळे कॉंग्रेस पक्ष जनतेच्या व्यथांना आवाज उठवण्यासाठी आता जनआक्रोश करणार असून संपूर्ण देशात हे आंदोलन होत असल्याची माहिती माणिकराव जगताप यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *