औरंगाबाद : तुम्हा खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे रे,….. मह्या भीमानं सोन्यानं भरलिया ओटी …. या लोकप्रिय गीताच्या गायिका कडूबाई खरात यांना हक्काच घर मिळालय. अतिक्रमण हटाव मोहिमेत त्यांच घर पाडण्यात आले होते त्यांचा संसार उघडयावर पडला होता मात्र काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी कडूबाईंना घर देण्याचा शब्द दिला होता. अवघ्या देान महिन्यात नानांनी शब्द खरा करून दाखवित काँग्रेस पक्षातर्फे कडूबाईंना हक्काचं घराचं घर दिलय.
दोन महिन्यापूर्वी कडूबाईंनी मागासवर्गीय मेळाव्यात काँग्रेसचे नेते चंद्रकांत हंडोरे यांची भेट घेऊन घर पाडण्यात आल्याने मदतीची विनंती केली होती त्यावेळी हंडोरे यांनी पटोले यांना कडूबाईंची व्यथा मांडून त्यांना घर देण्याची विनंती केली होती त्या वेळी नाना पटोले यांनी कडूबाई यांना घर देण्याचे आश्वासन दिले होते,
कोण आहेत कडूबाई …
कडूबाई खरात ह्या एक मराठी लोकगायिका आहेत. त्या भीमगीतांचे गायन करतात. “भीमानं माय सोन्यानं भरली ओटी”, “तुम्ही खाता त्या भाकरीवर”, “कुंकू लाविलं रमानं”, “आमचा मास्तर शिकवतो” ही त्यांनी गायिलेली काही लोकप्रिय भीमगीते आहेत. सोशल मिडीयावर त्यांची गाणी लोकप्रिय आहेत. कडूबाईंनी कोणत्याही प्रकारचे गायनाचे शिक्षण घेतलेलं नाही.