कर्नाटक : कर्नाटकात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने घवघवीत यश मिळाल्यानंतर अखेर कर्नाटकात काँग्रेसच सरकार स्थापन झाले आहे. आज सिद्धरामय्या यांनी दुसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. तर डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, माजी अध्यक्ष सोनिया गांधी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियांक गांधी यांनी उपस्थिती लावली. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांचे ट्विट करून अभिनंदन केले आहे >

सिद्धरामय्या यांनी आज कर्नाटकचे 30 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्याचसोबत कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्यात त्यांच्यासोबत आठ आमदारांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतली. या निष्ठावंत आमदारांचा समावेश आहे. सिद्धारमैया यांच्या मंत्रिमंडळात दलित, मुस्लिम, लिंगायत आणि ख्रिश्चन समाजातील प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना नेते अनिल देसाई, शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी, अभिनेते कमल हसन, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी हजेरी लावली.

कर्नाकच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रसने भाजपचा दारुण पराभव केला. कर्नाटक विधानसभेवर आपला झेंडा फडकवण्यात काँग्रेसला यश आले. हे काँग्रेसचे सर्वात मोठे यश मानले जात आहे. कर्नाटकात काँग्रेसने भाजपचा पराभव करत १३५ जागांवर विजय मिळवला. कर्नाटकच्या जनतेने काँग्रेसला पाठिंबा देत विजय मिळवून दिला. या निवडणुकीत भाजपला फक्त ६६ जागांवर समाधान मानावे लागले. तर जेडीएसला फक्त 19 जागांवर विजय मिळवण्यात यश मिळालं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *