भिवंडी ; काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.काँग्रेसचे नेते आणि ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे यांनाही राहुल गांधीबरोबर संवाद साधण्याची संधी मिळाली. यावेळी चोरघे यांनी भिवंडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेस पक्षाची स्थिती आणि तिथल्या प्रश्नाविषयी राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली. तसेच भिवंडी लोकसभा जिंकण्याचा विश्वास चोरघे यांनी राहुल गांधींना दिला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा राज्यात दाखल झाल्यापासून काँग्रेसचे नेते आणि ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे हे त्यांच्या असंख्य पदाधिकाऱ्यांसह भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. कळमनुरी जिल्हा हिंगोली येथे त्यांना राहुल गांधी यांच्याबसोबत पहिल्या रांगेत चालण्याची संधी मिळाली. त्यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यासोबत संवाद साधून आगामी भिवंडी लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी काँग्रेस सज्ज असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांच्या सोबत संवाद साधताना काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी भिवंडी येथे २०१४ मध्ये राहुल गांधी यांची सभा आपणच घेतल्याचे सांगितले. ठाणे ग्रामीण मधील काँग्रेसचे वाढत असल्याचे संघटन याची माहिती देऊन भिवंडी लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी काँग्रेस पक्ष सज्ज असल्याचे सांगितले. ठाणे जिल्ह्यात काँग्रेसला नवसंजीवनी देणाऱ्या जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या कामाचे राहुल गांधी यांनी कौतुक केले.
दरम्यान जिल्हा अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील ब्लॉक अध्यक्ष महेश धानके, विजय पाटील, प्रदीप पाटील, चेतनसिंह पवार, संजय जाधव, प्रांतिक सदस्य रवींद्र परटोले यांच्यासह असंख्य कार्यकर्ते भारत जोडो यात्रेत दाखल झाले आहेत.