डोंबिवली / प्रतिनिधी : करोनाच्या काळात वीज दरात वाढ करण्यात आल्याने महावितरण कंपनी कडून नागरिकांना भरमसाठ वीज बिल आली आहेत. कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, वेतनात कपात झाली, व्यवसाय उद्योग धंदे बंद पडले. आर्थिक परिस्थितीमुळे अनेकांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे वाढीव वीज दर कमी करण्यात यावे, अन्यथा लोकांच्या हितासाठी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना सरकारविरोधात उपोषण करू अशी मागणी वजा इशारा डोंबिवलीतील कॉंग्रेसचे माजी नगरसेवक नवीन सिंग यांनी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
वीज बिलामध्ये स्थिर आकार, वीज आकार हे एप्रिल महिन्यापासून वाढविण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना भरमसाठ बिले आली आहे. मार्च अखेर पासूनच कोरणांमुळे लॉकडाऊन करण्यात आलं. लॉकडाऊन अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, तसेच अनेकांच्या वेतन कमी करण्यात आलं. व्यवसाय उद्योग धंदे बंद पडल्याने व्यापारी वर्ग चिंतेत आहे. गोरगरिबांना काम नाही. अनेकजण बेरोजगार झाले आहेत. त्यांनी काय करायचं असा सवाल सिंग यांनी उपस्थित केला आहे. एकीकडे आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असतानाच दुसरीकडे वाढती बिल आल्याने मध्यमवर्गीय व गोरगरीब टेन्शनमध्ये आले आहेत. त्यामुळे एप्रिलम महिन्यापासून वाढलेले वीज दर माफ करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.—-