कुलाबा येथील झोपडीधारकांच्या न्याय हक्कासाठी , रिपाइंचे २० डिसेंबरला राजभवनासमोर आमरण उपोषण

मुंबई : कुलाबा येथील झोपडीधारकांना अपात्र ठरवून त्यांना बेघर करण्याचा डाव खासगी बिल्डरकडून आखला जात आहे. त्यामुळे झोपडीधारकांच्या न्याय हक्कासाठी हजारो झोपडीवासीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक) यांच्या नेतृत्वाखाली येत्या २० डिसेंबरला राजभवनासमोर उपोषण करणार आहेत अशी माहिती रिपाइं (डेमोक्रेटीक) मुंबई अध्यक्ष हिरामण साळवी यांनी दिली. झोपडीवासियांच्या न्याय हक्कासाठी मुख्यमंत्री, गृहनिर्माणमंत्री, प्रधान सचिव यांनाही निवेदन दिली आहेत. मात्र राज्य सरकारकडून कोणताच न्याय न मिळाल्याने अखेर झोपडीवासियांनी रिपाइंच्या नेतृत्वाखाली राज्यपाल सी विद्यासागर राव यांना निवेदन सादर केलय.

कफ परेड कुलाबा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर व श्री गणेश मुर्ती नगर झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टीला लागूनच मोठं टॉवर उभे राहिले आहेत. एसआरए योजनेतंर्गत झोपटपट्टीच्या जागेवर इमारती उभ्या केल्या जाणार आहेत. या वसाहतीत एकूण ६९९७ झोपडीधारक राहत आहेत. मात्र त्यापैकी २७६० झोपडीधारकांना पात्र दाखवले असून, उर्वरित ४२३७ झोपडीधारक हे अपात्र ठरविण्यात आले आहेत. झोपडीधारकांना अपात्र दाखवून ती जागा लाटून नफा कमावण्याचा खासगी बिल्डरचा डाव असल्याचा आरोप साळवी यांनी केलाय. १९७८ पासून याठिकाणी लोक राहत आहेत. त्यांच्याकडे फोटो पास आणि इतर पुरावे आहेत. १९९५ नंतर झोपडपट्टया वाढल्या ती जबाबदारी स्थानिक प्रशासनाची होती. त्याला झोपडपट्टीवासियांना दोष कसा देता येईल. झोपडपट्टीवासियांचे पूर्नवसन करण्यासाठी ११९५, १९९९ आणि आता २०१५ चा शासन निर्णय आहे. मात्र खासगी बिल्डरने स्वत:च्या फायद्यासाठी ७५ टक्के लोकांना अपात्र ठरवल्याचा आरोप त्यांनी केला. यासंदर्भात जिल्हाधिकारी, एसआरए अधिकारी व राज्य सरकारकडे दाद मागूनही न्याय मिळाला नाही त्यामुळेच राजभवनासमोर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. प्रत्येकाला घर मिळाले पाहिजे अशी आमची मागणी आहे असेही साळवी यांनी सांगितले.
——

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!