महाराष्ट्र हागणदारी मुक्त  :  मुख्यमंत्र्यांची घोषणा 

  मुबई  :  केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महाराष्ट्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात आले. सर्व प्रशासकीय यंत्रणेने मिशन  मोडवर  राज्यात  शौचालय  बांधण्याचे  काम  हाती          घेऊन राज्यात 60  लाखापेक्षा अधिक शौचालयाचे बांधकाम केले असून, आज महाराष्ट्र  हागणदारीमुक्त झाल्याची  घोषणा राज्याचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह येथे पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेत  या पत्रकार परिषदेस पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री सदाभाऊ खोत, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव शामलाल गोयल उपस्थित होते.

 मुख्यमंत्री  पुढे म्हणाले, राज्यात सन 2012 च्या बेसलाईन सर्वेनुसार केवळ 45 टक्के कुटुंबाकडे शौचालय होती. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत 55 टक्के कुटुंबांसाठी शौचालय  बांधण्याचे आव्हानात्मक काम होते. त्याचबरोबर स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत  संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेने नव नवीन कल्पना राबवून मिशन मोडवर काम करुन आपले उद्दिष्ट साध्य केले आहे.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, विविध तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देश प्रगती करीत असताना 50 टक्के भारतीयांकडे शौचालय सुविधा नसणे ही गंभीर बाब असल्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान घोषित करुन 2019 पर्यंत संपूर्ण देश हागणदारीमुक्त करण्याचे जाहीर केले. या अंतर्गत महाराष्ट्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबवून 2018 मध्येच महाराष्ट्र हागणदारीमुक्त करण्याचे काम केले आहे. राज्यातील  351 तालुके, 27  हजार  667 ग्रामपंचायती,  40 हजार 500 गावे हागणदारीमुक्त झाले आहेत.

महाराष्ट्रात एकुण 60 लाख 41 हजार 138 शौचालय बांधण्याचे काम करण्यात आले आहे. यासाठी 4 हजार कोटी पेक्षा अधिक खर्च केंद्र व राज्य शासनाच्या निधीमधून करण्यात आला आहे. विविध जिल्ह्यात उपलब्ध साधनसामुग्रीचा वापर करुन तेथील प्रशासकीय यंत्रणेने शौचालय बांधण्याचे काम केले आहे. पहिल्या टप्प्यात शौचालय बांधून प्रत्येकाला शौचालयाचा एक्सेस मिळवून देण्यात आला आहे. आता दुसऱ्या टप्प्यात प्रत्येकाने शौचालयाचा वापर करावा याबाबत जागृती करावी लागेल. शौचालय नसल्यामुळे  स्त्रियांची होणारी कुचंबना आता थांबेल. त्याचबरोबर आरोग्यदायी वातावरण राहील असेही मुख्यमंत्री म्हणाले.

मागील चार वर्षात बांधण्यात  आलेल्या शौचालयाची माहिती त

सन 2013-14 मध्ये 2 लाख 21हजार 849,

सन 2014-15 मध्ये 4 लाख 88 हजार 402,

सन2015-16 मध्ये 8 लाख 82 हजार 053,

सन 2016-17 मध्ये19 लाख 16 हजार 461 तर

सन 2017-18 मध्ये 22 लाख51 हजार 081

सार्वजनिक व सामुहिक शौचालय 2 लाख 81 हजार 292 अशी मिळून वैयक्तिक व सार्वजनिक 60 लाख 41 हजार 138 शौचालय बांधण्यात आले आहेत अशी महिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!