या दुर्घटनेमुळे महाराष्ट्र दु:खात : मुख्यमंत्री
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी रात्री उशिरा केईएम रुग्णालयात जाऊन एलफिन्स्टन चेंगराचेंगरीतील जखमींची भेट घेतली. दक्षिण कोरियाचा दौरा आटोपून मुंबईत दाखल झालेले मुख्यमंत्री थेट केईएम रुग्णालयात पोहोचले. “या दुर्घटनेमुळे महाराष्ट्र दु:खात आहे.या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचे मुख्यमंत्रयानी सांगितले.
रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात येईल. तसंच एलफिन्स्टनसारख्या मुंबईतील अशा पुलांचं ऑडिट केलं जाईल. त्यासाठी युद्धपातळीवर कामाला सुरुवात होईल. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत यासाठी तातडीने उपाययोजना केल्या जातील असंहे रेल्वेमंत्र्यांनी सांगितल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांसह शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!