कल्याण :- कल्याण शहरामध्ये रस्त्यांवर धुळीचं साम्राज्य पसरलंय. याबाबत सिक्रेट हार्ट शाळेच्या विद्यार्थी व शिक्षकांनी काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या व प्रभाग कार्यालयात आंदोलन केलं होतं. आज महापालिका आयुक्तांशी झालेल्या बैठकीनंतर सेक्रेड हार्ट शाळेच्या शिक्षकांनी महापालिकेला रस्त्यांवरील धूळ साफ करण्यासाठी १२ नोव्हेंबर पर्यंतचे अल्टिमेटम दिले आहे. दिवाळी सण तोंडावर आला आहे त्यामुळे 12 नोव्हेंबर पर्यंत जर धूळ साफ न झाल्यास शिक्षकांसह विद्यार्थी शर्ट काढून त्याच शर्टने रस्त्यांवरील धूळ साफ करतील असा इशारा केडीएमसी आयुक्तांना दिलाय.

पावसाळ्यानंतर महापालिकेने रस्त्यांवर खड्डे बुजवण्याचं ,रस्ते दुरुस्तीचे काम सुरू केलंय . यामुळे शहरात धुळीचे साम्राज्य पसरल आहे . रस्त्यावरील धुळीमुळे नागरिकांना विद्यार्थ्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागतय. रस्त्यांवरील धुळीबाबत सेक्रेड हार्ट शाळेच्या विद्यार्थी व शिक्षकांनी महापालिकेकडे तक्रारी केल्या निवेदन दिले .मात्र महापालिकेने दुर्लक्ष केल्याने काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या प्रभाग कार्यालयावर मोर्चा काढत रस्त्याची साफसफाई करत निषेध नोंदवला होता.

आज महापालिका आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांची शाळा प्रशासनाच्या शिक्षकांसह जागरूक नागरिक संघटनेसोबत बैठक घेतली . यावेळी शाळेच्या शिक्षकांनी महापालिका प्रशासन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियान संकल्पनेचे वाटोळे करत असल्याचा आरोप केला.या बैठकीत शिक्षकांनी महापालिकेला १२ नोव्हेंबर पर्यंत रस्त्यांवरील धूळ साफ करा असा अल्टिमेटम दिलाय . १२ नोव्हेंबर पर्यंत रस्त्यांवरील धूळ साफ केली नाही तर शाळेतील शिक्षकांसह विद्यार्थी शर्ट काढून त्याच शर्ट रस्त्यांवरील धूळ साफ करतील असा इशारा सेक्रेड हार्ट हायस्कूल संचालक ऑल्विन अँथोनी यांनी प्रशासनाला दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *