गडकरींच्या टीकेनंतर ‘ स्वच्छ डोंबिवली ‘अभियानासाठी डोंबिवलीकर आले एकत्र…
डोंबिवली :-  ( शंकर जाधव ) एकीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी `डोंबिवली हे सर्वात घाणेरडे शहर` अशी टीका केली असताना दुसरीकडे या टीकेवर चर्चा न करता `स्वच्छ डोंबिवली` करण्याचा निर्धार जागरूक डोंबिवलीकरांनी केला आहे. यासाठी या नागरिकांनी `स्वच्छ अभियान` सुरु केले आहे. यासाठी `स्वच्छ अभियान` व्हाॅट्सगुप बनवून जनजागृती करत शहराला वेगळे रूप देण्याचा प्रयत्न करत आहेत.
वाटसअप गुपमध्ये १३३ नागरिकांनी नोंद केली आहे. ओला कचरा- सुका कचरा वर्गीकरणाची माहिती जनतेपर्यत देणे, जागोजागी होणारा कचरा उचलण्यासाठी पालिकेकडे पाठपुरावा करणे आदी कामातून डोंबिवली शहर स्वच्छ करण्याचा प्रयत्न सुरु आहे. यासाठी केदार पाध्ये यांनी नागरिकांना आवाहन केल्यानंतर याला चांगला प्रतिसाद मिळाला.याबाबत केदार पाध्ये म्हणाले, याबाबत केंद्रींय मंत्री गडकरी यांनी डोंबिवली शहरावर टीका केल्यानंतर डोंबिवलीकरांनी विचार केला पाहिजे. डोंबिवली स्वच्छ शहर आणि सुंदर बनविणे हे प्रत्येक डोंबिवलीकरांचे कर्तव्य आहे. लोकप्रतिनिधी आणि पालिका प्रशासन यांना नेहमीच जबाबदार ठरवणे चुकीचे आहे. तर वंदना सोनावणे म्हणाल्या, या ग्रुपच्या माध्यमातून शहर स्वच्छतेचे धडे शिकविले जातील. या ग्रुपमधील सदस्य आठवड्यातून एक शहर स्वच्छतेसाठी देणार आहेत. नुकतेच पार पडलेल्या या ग्रुपची सभेत अनेक सूचना आल्या. या सूचनेवर विचार करून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. येत्या सोमवारी या ग्रुपची सभा होणार असून या सभेत नागरिक आपल्या सूचना मांडू शकता असे पाध्ये यांनी सांगितले. दरम्यान  गेल्यावर्षी गुढीपाडवा दिनानिमित्त काढण्यात आलेल्या स्वागतयात्रेत राजन गाला आणि काही जागरूक नागरिकांनी `स्वच्छ डोंबिवली- हरित डोंबिवली`, जागरूक डोंबिवलीकर मोहीम असे बॅनर घेऊन रस्त्यावर साफ सफाई केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *