बॉलिवूड विश्वातील प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे शुक्रवारी मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्या अस्वस्थ होत्या. त्यामुळे त्यांना वांद्रे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रात्री उशिरा त्यांची तब्येत खालावली आणि शुक्रवारी त्यांचे निधन झाले. त्या ७१ वर्षांच्या होत्या.
सरोज खान यांनी १९८३ मध्ये हिरो चित्रपटातून नृत्य कोरिओग्राफी करण्यास सुरुवात केली. तसेच हिंदी सिनेमाची अनेक सुपरहिट गाणी कोरिओग्राफ करण्याचे श्रेय सरोज खान यांना जाते. माधुरी दीक्षित आणि श्रीदेवी चित्रपटांमधील हिट गाण्यांच्या कोरिओग्राफीसाठीही ते खास ओळखले जातात.चार दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत सरोज खान यांच्याकडे २ हजारांहून अधिक गाण्यांच्या नृत्यदिशाचे श्रेय आहे.
कोरिओग्राफीच्या कलेमुळे सरोज खान यांना ३ वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. संजय लीला भन्साळी यांच्या ‘देवदास’ चित्रपटात, डोला-रे-डोला या गाण्यासाठी नृत्यदिग्दर्शनासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तसेच माधुरी दीक्षित यांच्या ‘तेजाब’ या चित्रपटाचं गाणं एक-दोन-तीन आणि २००७ मधील ‘जब वी मेट’ या गाण्याचे ‘ये इश्क’ या गाण्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.