अखिल भारतीय कोळी समाज संघटनेने दिला होता योगेश वडाळ यांना पाठिंबा
अकोला (मंगेश तरोळे- पाटील ) : अकोला जिल्हयातील चोहट्टा बाजार जिल्हा परिषद पोटनिवडणूकीत दिवंगत सभापती पंजाबराव वडाळ यांचे सुपुत्र योगेश पंजाबराव वडाळ हे विजयी झाले आहेत. वडाळ यांनी ३७८१ मतांची आघाडी घेत भाजप उमेदवाराचा दारून पराभव केला. अखिल भारतीय कोळी समाज संघटना वडाळ यांच्या पाठिंशी उभी होती.
अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे युवा प्रदेश अध्यक्ष मनोज बोईनवाड यांनी यांचे निकटवर्ती अकोला जिल्हयातील युवा नेतृत्व आशिष भोंडे यांच्या खांद्यावर अखिल भारतीय कोळी समाज संघटनेच्यावतीने संघटक मंत्री, महाराष्ट्र पदी नियुक्ती होताच, आशिष भोंडे यांनी अखिल भारतीय संघटनेच्या वतीने प्रथम दिवंगत सभापती यांचे सुपुत्र योगेश पंजाबराव वडाळ यांना पोटनिवडणूकीत पाठिंबा देवून त्यांच्या प्रचारार्थ अखिल भारतीय कोळी समाजाची टीमसह प्रचारार्थ स्व: पुढाकार घेवून अखिल भारतीय कोळी समाजाच्या विजयाची मुहूर्त अकोला जिल्हयातुन केली आहे.
अकोला जिल्हयातील भारीप बहुजन महासंघाचे, वचिंतचे दिवगंत सभापती पंजाबराव वडाळ यांचे दिर्घ आजाराने निधन झाले त्यांच्या या निधनाने समाजाची पोकळी न भरून निघण्यासारखी असल्याने वंचित नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी दिवंगत सभापती पंजाबराव वडाळ यांना श्रद्धाजंली देत भारीप बहुजन महासंघाच्या वतीने दिवंगत सभापती पंजाबराव वडाळ याच्या सुपुत्रास पोटनिवडणूकीत पक्षाचे तिकीट देवून पुन्हा अकोला जिल्हयातील आदिवासी कोळी समाजाचे मन जिंकण्यात यशस्वी प्रयत्न केला आहे. अकोला जिल्हा महादेव कोळी समाज आणि भारीप बहुजन महासंघ (वंचित) यांची एकजुटता कायम राखण्याचा बाळासाहेबांचा प्रयत्न यशस्वी झाला.
अकोला जिल्हयातील चोहट्टा बाजार जिल्हा परिषद पोटनिवडणूकीत दिवंगत सभापती पंजाबराव वडाळ यांचे सुपुत्र योगेश पंजाबराव वडाळ यांनी ३७८१ मतांची आघाडी घेत भाजप उमेदवाराचा दारून पराभव केला. नवनिर्वाचित जिल्हा परिषद उमेदवार योगेश पंजाबराव वडाळ यांच्या विजयामध्ये अखिल भारतीय कोळी कोरी समाज संघटना संघटन मंत्री आशिष भोंडे, दिपक ढवळी, विजय वावरे, प्रदीप फुकट, गोपाल अडबोल, शंकराव घुगरे, -माजी सरपंच, मंगेश तांडे (सरपंच), निलेश बगाडे, अनिल धांडगे, पंडीत चेचरे गजानन येलोने, गजानन ढोरे, नंदकिशोर नागिले, लंकेश डोंगरे, योगेश ढवळी, सुदर्शन किरडे, शांताराम दंदी-माजी सरपंच, संतोष धात्रे-माजी सरपंच दनोरी पनोरी, आदी अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे पदािधकारी यांनी या विजयासाठी अथक परिश्रम घेतले.
अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष केदारजी लखेपुरीया, सरचिटणीस सचिनजी ठाणेकर, युवा प्रदेश अध्यक्ष मनोज बोईनवाड साहेब यांच्या नेतृत्वात संघटनेने दिलेली जवाबदारी यशस्वीरित्या मी पार पाडण्याच्या प्रयत्न केला. समाज आणि संघटन म्हणून अखिल भारतीय कोळी समाजाचा संघटक म्हणून कायम समाजासाठी काम करणारा छोटा पदाधिकारी असून विजयी उमेदवार योगेश पंजाबराव वडाळ यांच्या विजयात मला खारीचा वाटा मिळाला त्यातच मला आनंद आहे. –आशिष भोंडे, संघटक मंत्री, अखिल भारतीय कोळी समाज संघटना महाराष्ट्र.