ठाणे : ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांची बुधवारी दुपारी भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ, भाजपा महिला ठाणे जिल्हाध्यक्ष मृणाल पेंडसे यांनी त्यांची भेट घेतली. अत्यंत चीड आणणारा आणि संतापजनक प्रकार असून राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असल्याची टीका चित्रा वाघ यांनी केली.
चित्रा वाघ पुढे म्हणाल्या की, मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठाण्यात एका महिला अधिकारी कर्तव्यावर असताना तिच्यावर हल्ला होणे ही शर्मनाक गोष्ट आहे. यावरूनच कायदा सुव्यवस्थेचा धिंडवडे उडाल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे राज्यात सरकार नावाची वस्तू आहे का ? महिला दहशतीखाली वावरतेय त्यामुळे हे कायद्याचे नव्हे तर गुंडाचे राज्य असल्याचा आरोप वाघ यांनी केला तर फेरीवाला धोरण तातडीपने राबविले पाहिजे असे त्या म्हणाल्या.