मुंबई : गेली अनेक वर्षे रखडलेल्या चिपी विमानतळाच्या उद्घाटन शनिवार ९ ऑक्टोबर रोजी होणार आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, केंद्रीय नागरी उडडानमंत्री ज्योतीरादित्य शिंदे, केंद्रीय सुक्ष्म व लघ उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत या विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. त्यामुळे चिपी विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमावरून ठाकरे राणे एकाच व्यासपीठावर येणार आहेत.
सिंधुदुर्गमध्ये शनिवारी होणाऱ्या चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रम पत्रिकेवरून नारायण राणे यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला आहे निमंत्रण पत्रिकेत माझं नावं लहान का ? राजकारणात प्रोटोकॉल असतो, असा सवाल राणेंनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना देखील राणे यांनी टोला लगावला आहे. “पाहुणे म्हणून आम्ही बोलावले आहे, पाहुणे म्हणून या आणि पदा प्रमाणे निधी देऊन जा” असं वक्तव्यं राणेंनी केलंय.
राणे यांच्या टीकेनंतर शिवसेनेचे उपनेते खासदार अरविंद सावंत यांनीही राणेंना टोला लागवला. राज्य सरकारला प्रोटोकॉल कळतो, तुम्ही सूक्ष्म मंत्री असल्याने नाव सुक्ष्म केलं आहे असा टोला सावंत यांनी लगावलाय.
या विमानतळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. विमानतळामुळे कोकणाच्य विकासाला चालना मिळेल, पर्यटन व्यवसाय विस्तारण्यास मदत होईल. कोकणाचे आकर्षण असलेल्या समुद्रापर्यंत आता विमानवाहतुक सुरु झाल्यामुळे अधिकाअधिक पर्यटकांना पोहचता येईल.
मुख्यमंत्रयाचा दौरा
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे सकाळी ११ वा.विमानाने चिपी विमानतळ, ता.वेंगुर्ला, जि.सिंधुदूर्गकडे प्रयाण करतील त्यानंतर दुपारी १२. १५ वा. चिपी परुळे विमानतळ, ता.वेंगुर्ला, जि.सिंधुदूर्ग येथे आगमन, दुपारी १ वा. ग्रिनफिल्ड विमानतळ सिंधुदूर्ग प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा, दुपारी २.३० वा.विमानाने मुंबईकडे प्रयाण