बीजिंग, 19 डिसेंबर :  चीनमध्ये सोमवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास आलेल्या शक्तिशाली भूकंपामुळे 111 जणांना जीव गमवावा लागला. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.2 इतकी मोजण्यात आली आहे. चायना अर्थक्वेक नेटवर्क सेंटरचे म्हणणे आहे की, भूकंपाचे जोरदार धक्के जाणवताच लोकांमध्ये घबराट पसरली.

चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे आतापर्यंत वायव्य चीनच्या गान्सू प्रांतात 100 आणि किंघाई प्रांतात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील ब्लू स्काय रेस्क्यू टीम मदत आणि बचाव कार्यात गुंतलेली आहे. वृत्तपत्रानुसार, गांसू प्रांतातील जिशिशन काउंटीमध्ये ६.२ तीव्रतेच्या भूकंपानंतर गांसू आरोग्य विभागाने ३३ रुग्णवाहिका आणि इतर व्यावसायिक वाहने तसेच १७३ वैद्यकीय कर्मचारी घटनास्थळी पाठवले.

किंघाई प्रांताने 68 रुग्णवाहिका आणि 40 हून अधिक प्रांतीय आणि नगरपालिका तज्ञांना बाधित भागात बचाव कार्य करण्यासाठी पाठवले. आज (मंगळवारी) सकाळी 6.30 वाजेपर्यंत 300 हून अधिक जखमींवर बाधित भागात उपचार करण्यात आले. राष्ट्रीय आरोग्य आयोगानेही तातडीने वैद्यकीय आपत्कालीन प्रतिसाद दल पाठवले. किंघाई प्रांतातील हैदोंगमध्ये भूकंपामुळे मोठे नुकसान झाले. येथील किमान तापमान सध्या उणे १२ अंश सेल्सिअसच्या खाली आहे. कडाक्याच्या थंडीत मदत आणि बचावकार्य सुरू आहे. जिक्सिशान परगण्यापासून हैदोंग 20 किलोमीटर अंतरावर आहे.

ग्लोबल टाइम्सच्या वृत्तानुसार, या भूकंपाने 2010 च्या आठवणींना उजाळा दिला आहे. 2010 मध्ये, गान्सू प्रांतात 6.6 तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपात 100 लोकांचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!