पंढरपूर, – मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्या हस्ते करण्यात आला. पंढरपुरातील संत मुक्ताबाई मठ येथे हा शुभारंभ करण्यात आला. राज्यातील महिलांनी याचा लाभ घ्यावा यासाठी रविवार दि.२१ जुलै रोजी गुरुपौर्णिमेपासून याचे राज्यभरात अभियान राबविले जाणार असल्याची माहिती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी दिली.
यावेळी शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे, अक्षय महाराज भोसले, स्वामी महामंडलेश्वर जनार्दन हरि महाराज, मुक्ताई पालखी सोहळयाचे अध्यक्ष रविंद्र भैय्यासाहेब पाटील, पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. रविंद्र महाराज हरणे, विश्वस्त श्री.पंजाब दादा पाटील,सम्राट पाटील यांच्यसह मान्यवर पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी एसटीच्या जादा गाड्या,वारकऱ्यांच्या वाहनांसाठी पथकर माफी तसेच महिलांना 50 टक्के व 75 वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास एस.टी अशा सुविधा उपलब्ध असून, या सुविधांसह वारकऱ्यांचा विमा देखील काढला असल्याचे डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.