पंढरपूर : लाडकी बहीण योजनेनंतर विद्याथ्र्यांसाठी खास विद्यावेतन योजनेची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंढरपुरात केली आहे बारावी पास झालेल्या विद्यार्थांना सहा हजार, डिप्लोमा १० हजार आणि डिग्रीच्या विद्यांर्थांना १२ हजार रूपये विद्यावेतन देण्याची घोषणा केली आहे. आषाढी एकादशीच्या शासकीय महापुजेसाठी एकनाथ शिंदे पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत.
शासकीय महापुजेआधी पंढरपूरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सुधाकर पंत परिचारक कृषी पंढरी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवाचं उद्घाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदी उपस्थित होते.
अर्थमंत्री अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशनात महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्याची घोषणा केली होती या योजनेतून महिला वर्गाला खूश करण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यामुळे विद्यार्थांना काहीच मिळालं नसल्याची टीका हेात होती त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी शासकीय महापूजेचं औचित्य साधून विद्यावेतन देण्याची घोषणा केली आहे.