डोंबिवली : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रविवार दिनांक १३ नोव्हेंबर डोंबिवलीत येत आहेत. ४४५ कोटी रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. तर संध्याकाळी ५:३० वाजता डोंबिवली नंदिवली येथे मुख्यमंत्र्यांची भव्य सभा होणार आहे. त्यामुळे सभेची जय्यत तयारी सुरू आहे. तसेच ज्या शिवसेनेच्या मध्यवर्ती शाखेवरून शिंदे गट आणि उध्दव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यामध्ये संघर्ष झाला होता ती शाखा शिंदे गटाने घेतली असून, त्या शाखेत मुख्यमंत्री भेट देणार आहेत. त्यामुळे शाखेला रंगरंगोटी आकर्षक रोषणाई करण्यात आलीय.
असा असेल कार्यक्रम
सायं.५ वा. कावेरी चौक एमआयडीसी डोंबिवली पूर्व
सायं.५.१५ वा. साईबाबा मंदिर, स्टार काॅलनी
सायं.५.३० भूमिपूजन व जाहीर सभा स्वामी समर्थ मठ चौक नांदिवली रोड.
सायं. ७ वा. बाळासाहेबांची शिवसेना डोंबिवली शहर मध्यवर्ती कार्यालय…