
डोंबिवली : डोंबिवलीतील चेतना नायर या विद्यार्थीनीने M.Tech. ( computer engineering ) परीक्षेत शंभर टक्के गुण पटकावले आहे. तिच्या यशाचे सर्वत्रच कौतूक हेात आहे. चेतना ही डोंबिवलीतील ज्ञानज्योती बिल्डींग शिवमंदिर रोड येथे राहते. मुंबईतील के जे सोमयया कॉलेजची ती विद्यार्थीनी असून. तिस-या आणि चौथ्या सेमीस्टर परीक्षेत तिने हे गुण मिळवले आहेत. तिच्या यशाबद्दल काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे, डोंबिवली शहर काँग्रेस बी ब्लॉक पूर्व उपाध्यक्ष प्रणव केणे, डोंबिवली पश्चिम ए ब्लाॅक अध्यक्ष शशिकांत चौधरी यांनी घरी जाऊन चेतना हिचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
