कल्याण : मुंबईतील पत्राचाळ प्रकरण गाजत असतानाच कल्याणातही असाच काहीसा प्रकार उजेडात आला आहे. पूर्नवसनाच्या नावाखाली सामान्य नागरिकांची कोटयावधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आयुष इन्फ्राक्स्ट्रक्चरच्या मालक आणि अन्य साथीदारांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
कल्याण पूर्वेतील तीसगाव येथील आयुष्य इन्फ्राक्स्ट्रक्चरचे मालक मनोज नायब गुप्ता यांनी आयुष इन्कलेव्ह च्या नावाखाली २०१३ साली ओम साई राम सोसायटी सोबत पुर्नवसन करार करून सोसायटी च्या चाळी तोडण्यात आल्या. ८१ सदनिकाधारक यांच्या सोबत पूनर्वसन करण्याचे आश्वासन देण्यात आले तसा करार ही करण्यात आला. २०१९ पर्यंत या गरिबांना घरे बांधून देण्याचे आश्वासन देऊन आज पर्यंत त्यांना घरे दिली नाहीत.
मनोज नायब गुप्ता व राजेश कुमार शर्मा या दोघांनी ओम साई राम सोसायटीमधील नागरिकांची घोर फसवणूक केल्याचा आरोप रहिवाशांनी केलाय. पुढे या दोघांनी संतोष गुप्ता यास आपल्या आयुष इन्फ्राक्स्ट्रक्चर या कंपनीमध्ये भागीदार करून घेतले व एक इमारत बांधकाम पूर्ण होण्याआधीच त्यातील काही घरे रोख स्वरूपात बाहेरील व्यक्तीस अवाजवी रक्कम घेत लाखो रुपयांत विकली. त्यातील काही जण रोख रक्कम देऊ शकले नाहीत म्हणून त्यांची घरे याच तिघांनी ओम साई राम सोसायटीमधील पदाधिकारी सचिव विकास शिवाजी जाधव यांच्यासह मिळून कारस्थान रचून बाहेरच्या लोकांना तेथील घरे विकली आहेत. त्यासाठी त्यांनी बनावट कागदपत्रे बनवुन दुसऱ्यांना घरे विकल्याचे पोलीस तपासात आढळून दिसून आले आहे.
जवळपास १०० सदनिकाधारकांपैकी ३० ते ४० गरीब व गरजू नागरिकांची घरे परस्पर बाहेरील व्यक्तिक्स विकले आहेत. त्यात विकास जाधव यांना हाताशी धरून मनोज नायब गुप्ता यांच्या कडून सोसायटी मधील काही जणांचे घरे परस्पर दुसऱ्याच व्यक्तींना विकले आहेत . तसेच ओम साई राम सोसायटी मधील नागरिकांना २०१९ पासून ते आजपर्यंत ४.५ ते ५ कोटी रुपयांपर्यंतची भाडे थकवली आहेत.
या सर्व प्रकरणी बाहेरील लोकांना घरे विकताना बनावट कागदपत्रे तयार करून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, तसेच दुय्यम निबंधक कार्यालयाची ही दिशाभूल करत काही जणांकडून लाखो रुपये घेऊन घरांचे दस्त नोंदणी केली आहे . काही दिवसांनी ओम साई राम सोसायटी मधील काही नागरिकांना या घरे विक्री ची कुणकुण लागताच त्यांनी कोळसेवाडी पोलीस स्टेशन येथे आयुष इन्कलेव्ह चे मालक मनोज नायब गुप्ता यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. कोळसेवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद रजि क्रमांक ६७२/२०२३ कलम ४२०, ४०६, ४६५, ४६७, ४७१,१२० ब ३४ भा दं वि सह कलम ३,४ व ५ महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिका (बांधण्यास प्रोत्साहन देणे,व्यवस्थान व हस्तांतरण यांचे नियमन करण्याबाबत) अधिनियम १९६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा ठाणे यांच्या कडून करण्यात येत आहे.
आर्थिक गुन्हे शाखा च्या तपास पथकाने संतोष कुमार यादव तसेच विकास शिवाजी जाधव यांना अटक करण्यात आर्थिक गुन्हे शाखेला यश आले आहे. व या सर्व प्रकरणात इन्फ्राक्स्ट्रक्चर चे मालक मनोज नायब गुप्ता हे फरार आहेत व पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मनोज नायब गुप्ता व राजेश कुमार शर्मा यांना पोलिसांनी तातडीने अटक करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे .
़़़