अखेर छगन भुजबळांना जामीन मंजूर : नाशिक येवल्यात जल्लोष !
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना मुंबई हायकोर्टाने जमीन मंजूर केलाय. तब्बल दोन वर्षानंतर भुजबळ हे तुरुंगातून बाहेर येणार आहेत. त्यामुळे भुजबळ समर्थकांनी नाशिक आणि येवल्यात जल्लोष केला.
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी १४ मार्च २०१६ पासून भुजबळ हे – मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये होते. अनेक दिवसापासून छगन भुजबळ यांनी जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते, मात्र सतत त्यांना जामीन नाकारला जात होता. छगन भुजबळ यांची प्रकृती तुरूंगात सतत ढासळत असल्याची तक्रार देखील होत होती. छगन भुजबळ यांना जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला आहे.
**