चरणदास चोर २२ डिसेंबरला प्रदर्शित होणार
मुंबई : साध्या व गरीब स्वभावाच्या चाकरण्याची गोष्ट रेखाटलेला युनीट प्रोडेक्शन निर्मित चरणदास चोर हा चित्रपट २२ डिसेंबरपासून महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
हिंदी टिव्ही मालिका विश्वासातील एक अग्रगण्य लेखक दिग्दर्शक श्याम माहेश्वरी आजच्या काळातील साध्या सरळ नाकासमोर चालणा-या सामान्य माणसाची गोष्ट मामिर्क विनोदी पध्दतीने प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहेत. ज्येष्ठ दिग्दर्शक अनुभ सिन्हा आहेत. चरण चंद्रकांत मोरे या साध्या व गरीब स्वभावाच्या चाकरमण्याची गोष्ट आहे. या चित्रपटाची कथा श्याम महेश्वरी यांची आहे. सोलापूर बार्शीचा नाटय कलावंत अभय चव्हाण या कलाकाराने चरणची भूमिका बजावली आहे. सुप्रसिध्द अभिनेत्री नीना गुप्ता तसेच सोबतीला मुकूंद वचुले, सोनम पवार, अनुया बैचे, मिलींद ओक आणि बालकलाकार आदेश आवारे आहेत. संत कबीर आणि गीतकार मंदार चोळकर यांच्या रचनांना सोनी मिक्स वाहिनीच्या माध्यमातून इंडियन म्युझिक लॅबच्या रोहित मांजरेकर यांनी संगीतबध्द केले आहे. सुप्रसिध्द गायक पद्मश्री टिप्पणिया आतीफ अफजल प्रीती देशमानकर गीतसागर गौरव बांगिया पावनी पांडे अली असल्म यांनी गाणी गायली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *