ठाणे : ठाणे महानगरपालिकेमधील कासारवडवली वाहतूक विभागाच्या हद्दीत वडाळा ते कासारवडवली मेट्रोलाईनचे गर्डर टाकण्याच्या कामामुळे दि. १६ ते २१ नोव्हेंबर याकाळात रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद करून वाहतूक वळविण्यात येणार असल्याची माहिती ठाणेशहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी कळविली आहे.

वडाळा ते कासारवडवली मेट्रो ४ च्या विस्तारासाठी कासारवडवली ते गायमुख पर्यंतचे काम सुरु आहे. मार्गावरील मेट्रोसाठी गर्डर बसविण्यात येणार आहे. या कामामुळे घोडबंदर रोडने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना कापूरबावडी जंक्शन येथे प्रवेश बंद करण्यात येणार आहे. येथील वाहतूक खालील मार्गाने वळविण्यात येणार आहे.

प्रवेश बंद – मुंबई-नाशिक महामार्गाने माजिवाडा, कापूरबावडी घोडबंदर रोडच्या दिशेने जाणाऱ्या जड अवजड व इतर सर्व – प्रकारच्या वाहनांना तत्त्वज्ञान विद्यापीठ, कापूरबावडी जंक्शन येथे “प्रवेश बंद” करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग -1) मुंबई-नाशिक महामार्गाने माजिवाडा, कापूरबावडी मार्गाने घोडबंदर रोडच्या दिशेने जाणारी जड अवजड वाहने ही – कापूरबावडी सर्कल येथून उजवे वळण घेवुन बाळकुम नाका, भिवंडी आग्रा रोड, कशेळी, काल्हेर, अंजुर फाटा मार्गे किंवा माजीवाडा उड्डाणपुलाखालून यु टर्न घेवून खारेगांव ब्रिज, मानकोली नाका मार्गे इच्छित स्थळी जातील, २) सदरची जड अवजड वाहने वगळून इतर हलकी वाहने तत्वज्ञान विद्यापीठ येथून डावीकडे वळण घेवून सर्व्हिस रोड मार्गे किंवा रवी स्टील, पोखरण रोड नं. २, गांधीनगर, वसंत विहार सर्कल, खेवरा सर्कल मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद – मुंबई कडून कापूरबावडी जंक्शन तत्वाज्ञान विद्यापीठ मार्गे घोडबंदर रोडकडे जाणाच्या सर्व जड अवजड वाहनांना माजीवाडा गोल्डन डाईज ब्रिज वर वाय जंक्शन येथे ‘प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग- सदरची जड अवजड वाहने ही नाशिक रोडने खारेगांव टोलनाका, मानकोली नाका, अंजुर फाटा मार्गे इच्छित स्थळ जातील.

गर्डर टाकण्याचे काम पूर्ण होईपर्यंत ही पर्यायी व्यवस्था राहणार आहे. पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडॉर, ऑक्सिजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही, असे पोलीस उप आयुक्त बाळासाहेब पाटील यांनी कळविले आहे.

ठाणे शहरात वाहतूक मार्गात बदल

जुना कोपरी ब्रिज बंद करून त्याचे जागेवर नव्याने ब्रिज उभारणी करण्यात येणार आहे.या ब्रिजचे काम सुरू करण्याकरीता जुना ब्रिज बंद करून सर्व वाहतूक दिनांक 16 नोव्हेंबर 2021 ते दि 17 नोव्हेंबर 2021 रोजी नव्या ब्रिजने वळविण्यात येणार आहे असे ठाणे शहर पोलीस उप आयुक्त बाळासाहेब पाटील यांनी कळविले आहे. सकाळी 07:30 ते 10:30 वाजेपर्यंत तीनहात नाका येथून जाणारी सर्व प्रकारची वाहतुक गुरुद्वारा सर्व्हिस रोडने भास्कर कॉलनी कट पर्यंत एकेरी राहील. तसेच संध्याकाळी 05:00 वा ते रात्री 09:00 वाजे पर्यंत कोपरी सर्कल कडून तीन हात नाक्याकडे जाणारी वाहतूक भास्कर कॉलनी कट मार्गे गुरुद्वारा सर्व्हिस रोडने तीन हात नाक्यापर्यंत एकेरी राहील.

नाशिक – मुंबई वाहिनी वरुन नौपाडा वाहतूक उपविभागाचे हद्दीतून नाशिक दिशेने तीन हात नाका ब्रिज खालून जाणारी संपूर्ण वाहतूक तीन हात नाका येथून गुरुद्वारा समोरील कट येथून सर्व्हिस रोडने भास्कर कॉलनी कट मार्गे कोपरी सर्कल येथून इच्छित स्थळी जातील.

एक दिशा मार्ग – तिन हात नाका ब्रिज खालून जुन्या कोपरी ब्रिजवर जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सकाळी ०७:३० ते १०:३० वा. पावेतो तिनहात नाका येथे प्रवेश बंद करून एक दिशा मार्ग करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग- सरदची वाहने तीन हात नाक्यावरुन गुरुद्वारा सर्व्हिस रोड मार्गे भास्कर कॉलनी कट कोपरी सर्कल मार्गे इच्छित स्थळी जातील.

एक दिशा मार्ग – कोपरी सर्कल येथुन तिनहात नाक्याकडे जाणाच्या सर्व प्रकारच्या वाहनांना सकाळी ०७:३० ते १०:३० वा. पावेतो भास्कर कॉलनी कट येथे प्रवेश बंद करून एक दिशा मार्ग करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग- सदरची सर्व वाहने भास्कर कॉलनी कट येथुन टेलिफोन नाका, हरीनिवास सर्कल मार्गे इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद- मुंबई कडून आनंदनगर टोलनाका मार्गे जुन्या कोपरी ब्रिजवर जाणाच्या सर्व प्रकारच्या वाहनांना जुन्या कोपरी ब्रिजवर प्रवेश बंद कण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग- सदरची वाहने आनंदनगर टोलनाक्यावरून नवीन कोपरी ब्रिज वरून तीन हात नाका मार्गे इच्छित स्थळी जातील.

सदरची वाहतुक ही पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!