ठाणे, दि.02 : ठाणे महानगर पालिका क्षेत्रामध्ये लोकमत मिडीया प्रा. लिमिटेड यांच्यावतीने लोकमत महामॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन दि.04 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 05.00 ते 10.00 वाजेपर्यंत होणार आहे. या स्पर्धेच्या कालावधीत शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आले असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.
वाहतुकीत बदल पुढील प्रमाणे आहे.
प्रवेश बंद – बिरसा मुंडा चौकातुन पवारनगरकडे जाणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना बिरसा मुंडा चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – सदरची वाहने पवारनगर कडून बिरसा मुंडा चौकाकडे येणा-या वाहिनीवरून डाव्या बाजुने मार्गस्त होतील. नमुद वाहिनो मॅरेथॉन स्पर्धा संपेपर्यंत दुहेरी मार्ग करण्यात येत असुन सदरची वाहने पुढे इच्छीत स्थळी जातील.
प्रवेश बंद - वसंत विहार चौकातून काशिनाथ घाणेकर चौकाच्या दिशेने जाणा-या वाहनासाठी काशिनाथ घाणेकर चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – सदरची वाहने काशिनाथ घाणेकर चौकाकडून वसंत विहार चौकाकडे येणा-या वाहिनीवरून डाव्या बाजुने मार्गस्त होतील. नमुद वाहिनी मॅरेथॉन स्पर्धा संपेपर्यंत दुहेरीमार्ग करण्यात येत असून सदरची वाहने पुढे इच्छीत स्थळी जातील.
प्रवेश बंद - काशिनाथ घाणेकर चौकातून खेवरा सर्कल दिशेने जाणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना काशिनाथ घाणेकर चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग - सदरची वाहने खेवरा सर्कल कडून काशिनाथ घाणेकर चौकाकडे येणा-या वाहिनीवरून डाव्या बाजुने मार्गस्त होतील. नमुद वाहिनी मॅरेथॉन स्पर्धा संपेपर्यंत दुहेरी मार्ग करण्यात येत असून सदरची वाहने पुढे इच्छीत स्थळी जातील.
प्रवेश बंद – खेवरा सर्कलकडुन टिकुजीनिवाड़ी सर्कल दिशेने जाणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना खेवरा सर्कल येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – सदरची वाहने टिकुजीनिवाड़ी सर्कलकडून खेवरा सर्कल दिशेने येणा-या वाहिनीवरून डाव्या बाजुने मार्गस्त होतील. नमुद वाहिनी मॅरेथॉन स्पर्धा संपेपर्यंत दुहेरी मार्ग करण्यात येत असुन सदरची वाहने पुढे इच्छीत स्थळी जातील.
प्रवेश बंद – बिरसामुंडा चौकाकडुन गांधीनगर दिशेने जाणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना बिरसा मुंडा चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – सदरची वाहने गांधीनगरकडून बिरसामुंडा चौक दिशेने येणा-या वाहिनीवरून डाव्या बाजुने मार्गस्त होतील. नमुद वाहिनी मॅरेथॉन स्पर्धा संपेपर्यंत दहेरी मार्ग करण्यात येत असून सदरची वाहने पुढे इच्छित स्थळी जातील.
प्रवेश बंद – गांधीनगर चौकाकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक दिशेने जाणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना गांधीनगर चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – सदरची वाहने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौककडून गांधीनगर चौक दिशेने येणा-या वाहिनीवरून डाव्या बाजूने मार्गस्त होतील. नमुद वाहिनी मॅरेथॉन स्पर्धा संपेपर्यंत दुहेरी मार्ग करण्यात येत असून सदरची वाहने पुढे इच्छीत स्थळी जातील.
प्रवेश बंद – शास्त्रीनगर वर्तकनगर कडून रेमंड कॅडबरी जंक्शनकडे जाणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना शास्त्रीनगर चौक येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – सदरची वाहने कॅडबरी जंक्शनकडून वर्तकनगर – शास्त्रीनगर चौक दिशेने येणा-या वाहिनीवरून डाव्या बाजुने मार्गस्त होतील. नमुद वाहिनी मॅरेथॉन स्पर्धा संपेपर्यंत दुहेरी मार्ग करण्यात येत असून सदरची वाहने पुढे इच्छीत स्थळी जातील.
प्रवेश बंद – देवदयानगर – शिवाईनगर – येउर गेट – बिरसामुंडा चौक कडून रेमंड कॅडबरी जंक्शनकडे जाणा-या सर्व प्रकारच्या वाहनांना देवदयानगर कट येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग – सदरची वाहने बिरसामुंड चौक – बेधनी हॉस्पीटल मार्गे इच्छीत स्थळी जातील.
पर्यायी मार्ग – येउर गेट कडून येणारी सर्व प्रकारची वाहने उपवन तलाव पायलादेवी मंदिर बिरसा मुंडा चौकातून पुढे इच्छीत स्थळी जातील.
मॅरेथॉन स्पर्धेच्या संपूर्ण मार्गावर स्पर्धा संपेपर्यंत रस्त्याचे दोन्ही बाजूस सर्व प्रकारची वाहने उभी करण्यास मनाई करण्यात येत आहे. सदरची वाहतुक नियंत्रण अधिसचुना ही पोलीस वाहने, रूग्ण वाहिका, फायर ब्रिगेड व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहने तसेच मॅरेथॉन स्पर्धेतील वाहनास लागू राहणार नाही, असे ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी कळविले आहे.