दिल्ली : भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेला वेग आला असून १४ जुलै रोजी दुपारी २.३५ वाजता ‘चांद्रयान-३’ अंतराळात प्रक्षेपित केले जाणार असल्याचे इस्रोने जाहीर केले आहे. हे यान २३ ऑगस्टला चंद्रावर उतरण्याची शक्यताही इस्रोकडून व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे भारत पून्हा एकदा चंद्रावर पाऊल टाकण्यासाठी सज्ज झालाय.चांद्रयान-३ हे भारताच्या चांद्र अभियानातलं तिसरं यान आहे.
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) नियोजित चंद्रयान-३ मोहीम हाती घेतली असून ती यशस्वी करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. १२ ते १९ जुलैदरम्यान ही अंतराळ मोहीम प्रक्षेपित होणार असून चंद्रावर अंतराळ यान उतरवण्याचा भारताचा दुसरा प्रयत्न असेल. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून चंद्रयान-३ अवकाशात झेपावेल. चंद्रयानला अवकाशात घेऊन जाण्याची जबाबदारी ‘व्हेईकल मार्क-३’ (एलव्हीएम-३) या प्रक्षेपणयानातून हे यान चंद्राकडे झेपावेल. चंद्रयान-३ चे एकूण बजेट ६१५ कोटी रूपये असल्याचे सांगितलं जातय.
चंद्रयान-३ हे भारताच्या चांद्र अभियानातलं तिसरं यान आहे. या मोहिमेत चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा म्हणजे अलगदपणे यान उतरवण्याचा प्रयत्न केला जाईल. याआधी केवळ रशिया, अमेरिका आणि चीन या तीनच देशांना चंद्रावर सॉफट लॉन्डींग करता आलय. पहिले चंद्रयान यशस्वी झाल्यानंतर भारताने दुसरी चंद्रयान मोहीम राबवली, मात्र तांत्रिक बिघाडामुळे शेवटच्या क्षणी ही मोहीम अयशस्वी ठरली हेाती. मात्र चंद्रयान- ३ हे अपयश दूर करण्याचा प्रयत्न करेल.
चंद्राच्या पृष्ठभागावरील रासायनिक आणि नैसर्गिक द्रव्यं, माती, पाण्याचे अंश यांचा अभ्यास करून चंद्राविषयीच्या आपल्या ज्ञानात भर घालण्याचा प्रयत्न ही मोहीम करेल. चंद्रयान-3 फक्त भारतासाठीच नाही, तर जागतिक स्तरावरही शास्त्रज्ञांसाठी महत्त्वाची आहे. या मोहिमेतलं लँडर यान चंद्राच्या पृष्ठभागावर अशा ठिकाणी उतरवलं जाणार आहे, जिथे आधी कुणी पोहोचलेलं नाही.एक तर हे यान याआधीच्या चांद्र मोहिमांमध्ये मिळालेल्या ज्ञानात भर घालू शकतं. तसंच भविष्यातल्या चांद्र मोहिमांसाठी माणसाची क्षमता आणखी विकसित करू शकतं.
चंद्रयान- ३ ची उद्दीष्टयं
चंद्रावर यशस्वीरित्या अलगद उतरवणं, चंद्रावर संचार करण्याची रोव्हरची क्षमता दर्शवणं आणि वैज्ञानिक निरीक्षणं नोंदवण हे प्रमुख उद्दीष्ट आहेत. ‘चंद्रयान-१’ आणि ‘चंद्रयान-२’ यांच्याद्वारे चंद्राच्या सभोवतालच्या वातावरणाचा अभ्यास करण्यात येणार होता. मात्र चंद्रयान-३ प्रत्यक्ष चंद्रावर उतरून तेथील वातावरण आणि परिस्थितीचा अभ्यास करणार आहे. ‘चंद्रयान-३’ हे अगदी ‘चंद्रयान-२’सारखेच असणार आहे. मात्र यावेळी फक्त लँडर-रोव्हर आणि प्रोपल्शन मॉडेल असेल. ‘चंद्रयान-३’ हे यान प्रॉपलंट मॉडय़ुल ‘लँडर’ आणि ‘रोव्हर’ला चंद्राभोवतील १०० किलोमीटरच्या कक्षेत नेईल आणि ‘चंद्रयान-३’ अलगदपणे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. ‘चंद्रयान-३’मध्ये ऑर्बिटर पाठवण्यात येणार नाही. कारण चंद्रयान-२च्या ऑर्बिटरकडून यासाठी मदत घेण्यात येणार आहे.